अफवांचा पेव बुजविण्यासाठी पोलिसांना पत्रकारांना द्यावीच लागली माहिती

प्रेम प्रकरणातील मृतक मुलगी पायल पवार नसून ऋतुजा खरात : पोलीस तपासात आली माहिती समोर

खामगाव (जनोपचार ब्युरो) साखरखेर्डा नजीक शिंदी येथील ऋतूजा पद्माकर खरात या युवतीची खामगाव येथील जुगनू हॉटेल येथे तिच्या प्रियकराने चाकूने भोसकून निघृण हत्या केली. त्यानंतर साहील उर्फ सोनू राजपूत या प्रियकर युवकाने स्वतःला चाकूने भोसकून घेत आत्महत्या केल्याची माहिती आहे.खामगाव शहरातील सजनपुरी येथील जुगनू हॉटेलमध्ये २३ सप्टेंबर रोजी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास हे थरारक हत्याकांड घडले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात पाठवले आहे. दोन्हीही प्रेमीयुगुल साखरखेर्डा परिसरातील रहिवासी  आहेत. घटनेची माहिती शहरात पसरतात एकच गर्दी जमा झाली होती पोलिसांनी पत्रकारांनाही घटनेपासून दूर ठेवल्यामुळे नेमकं काय झालं हे जनतेला माहिती झालं नाही परंतु पोलिसांच्या उशिरा लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ पत्रकारांना माहिती पुरविली. हे प्रकरण विशिष्ट समाजाचे नसल्या च्या बातम्या लगेच डिजिटल व मीडिया पसरल्यानंतर नागरिकांच्या लक्षात आले व हळूहळू गर्दी कमी व्हायला लागली. मात्र त्यावेळी मुलीचे नाव पायल पवार असे सांगण्यात आले होते मात्र त्यानंतर तपासात सदर मुलीचे नाव पायल पवार नसून ऋतुजा खरात असल्याचे समोर आले.

जाहिरात


सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील सोनू राजपूत (वय २२) व ऋतूजा पद्माकर खरात, रा. शिंदी, ता. सिंदखेडराजा हे प्रेमीयुगुल खामगाव-चिखली रोडवरील हॉटेल जुगनूमध्ये थांबले होते. यामध्ये सोनू राजपूत याने ऋतुजाला चाकूने भोसकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर सोनू राजपूत यानेदेखील त्याच चाकूने भोसकून घेत आत्महत्या केली. या दोघांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती असून, या हॉटेलमध्ये ते यापुर्वी ८ वेळा आले असल्याचेही रजिष्टरवरून कळते. दरम्यान सदर घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच खामगाव शहरात खळबळ उडाली व मोठ्या प्रमाणात जमाव गोळा झाला होता. घटनास्थळी पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, सहाय्यक पोलिस अधीक्षक लोढा, डीवायएसपी प्रदीप पाटील आदींसह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या.या दुर्देवी घटनेतील ऋतुजा पद्माकर खरात, रा. शिंदी ही युवती खामगाव येथील शासकीय पॉलिटेकनीक कॉलेजला संगणक अभियांत्रिकी तृतीय वर्षात (ओबीसी कॅटेगीरी) शिकत होती.

Post a Comment

أحدث أقدم