मॉर्निंग वॉकला निघालेल्या पादचारास एसटी महा मंडळाच्या बसने दिली जोरदार धडक: जागीच मृत्यू
जनोपचार न्यूज नेटवर्क खामगाव:- मॉर्निंग वॉकला निघालेल्या पदाच्या एसटी महामंडळाच्या बसने मागून धडक दिल्यामुळे त्यांचा जागेचा मृत्यू झाला. हि घटना आज सकाळी ६ वाजता उघडकीस आली. सुरेंद्रसिंग कोचर (जुगनू हॉटेल )असे मृतकाचे नाव आहे. ते मॉर्निंग वॉल का जात असताना चिखली रोड वरील संदीप मार्बल जवळ चिखली कडे जात असलेल्या शेगाव- अहिल्यानगर या st बस ने त्यांना धडक दिली.उल्लेखनीय म्हणजे उशिरापर्यंत पोलिस मदत मिळाली नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली.दरम्यान शव विछेदन गृहात रवाना करण्यात आले. वृत्तलेपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे जनोपचार न्यूज नेटवर्क कडून भावपूर्ण श्रद्धांजली

Post a Comment