धक्कादायक::भाजपा च्या शहर अध्यक्षाची आत्महत्या

 बीड : 


महाराष्ट्रमध्ये सध्या मोठ्या राजकीय घडामोडी होत असताना बीडमध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. भाजपचे बीड शहर अध्यक्ष भगीरथ बियाणी यांनी राहत्या घरात स्वता: वर गोळी झाडून आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे बीड शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. बियाणी यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भगीरथ बियाणी यांनी आपल्या राहत्या घरीच स्वतःला गोळी झाडत आत्महत्या केली. त्यांना लगेच शहरातील फिनिक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु, तोपर्यंत डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं होतं.

Post a Comment

أحدث أقدم