लम्पी या आजाराबाबत प्रशासनाने तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी- आ.आकाश फुंडकर तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास

 लम्पी या आजाराबाबत प्रशासनाने तात्काळ आवश्यक कार्यवाही करावी- आ.आकाश फुंडकर

तहसीलदार, मुख्याधिकारी, गटविकास


अधिकारी व पशु वैद्यकीय अधिकारी यांना दिले निर्देश

देशात लम्पी या आजाराने थैमान घातले असताना खामगाव शहरात बेवारस फिरणारे जनावरांमध्ये लम्पी आजाराने ग्रस्त जनावरे फिरताना दिसत आहे याबाबत प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून अशा जनावरांचे विलगीकरण करावे व हा आजार इतर गोवंशामध्ये पसरणार नाही व त्यापासून गोवंशाची जीवित हानी होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश आमदार ऍड आकाश फुंडकर यांनी दिले.

 लम्पी हा आजार संपूर्ण देशात पसरलेला असताना प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात लसीकरणाचे काम सुरू आहे याबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी एकमेकांशी समन्वय साधून याबाबत तात्काळ आवश्यक पावले उचलणे आवश्यक आहे. खामगाव शहरात देखील जगदंबा चौक भागात चांदे कॉलनी भागात व नाथ प्लॉट भागात अशा प्रकारचे लम्पी या आजाराने ग्रस्त गोवंश फिरत असल्याचे कळले. तरी शहरातील अशा जनावरांचे तात्काळ  विलगीकरण करून त्यांना सॅनिटाइज करावे व आवश्यक ती खबरदारी घ्यावी याबाबत तहसीलदार मुख्याधिकारी गटविकास अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी समन्वय साधून तात्काळ पावले उचलावी असे निर्देश खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ऍडव्होकेट आकाश फुंडकर यांनी आज दिले आहेत

Post a Comment

أحدث أقدم