माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांचा गौतम गवई व सहकार्यांच्या वतीने सत्कार
खामगाव- दिनांक ९ आक्टोंबर रोजी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉ. नितीन राऊत यांचा वाढदिवस राज्यभर साजरा करण्यात आला . खामगाव येथील असंख्य कार्यकर्त्यानी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस अनुसूचित जाती विभागाचे सचिव गौतम गवई व अंबादास वानखडे यांचे नेतृत्वाखाली नागपूर येथे जाऊन डॉ. नितीन राऊत यांचे वाढदिवसानिमित्त पुष्पहार घालून अभिनंदन केले व पुढिल वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.
नितिन राऊत हे तळागाळातील समाजाला न्याय देणारे व सर्वसामान्य जनतेच्या समस्या पोटतिडकीने सोडविणारे सजग नेतृत्व आहे अशा शब्दात डॉ. नितीन राऊत यांचा गौरव गौतम गवई यांनी केला . तसेच नितिन राऊत हे आंबेडकरी चळवळीतील अभ्यासू नेतृत्व आहे असे गौरवोदगार अंबादास वानखडे यांनी काढले . बौध्द धम्म विषयक कार्यात सदा अग्रेसर असलेले डा. राऊत यांचे राजकारणातील वाढते वजन हे आनंदाची बाब आहे ,अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या . सत्कार करतेवेळी गौतम गवई यांचे सोबत जेष्ठ आंबेडकरी नेते तथा सोशल फोरमचे विदर्भ संघटक अंबादास जी वानखडे, जळगांव जिल्हाध्यक्ष सोशल फोरम प्रविण सुरवाडे , राजेश जी लाडे गजानन भाऊ दामोदर , मनोज बोदडे , महेंद्र खंडारे, नितीन वाघ ,गजानन तायडे ,महेंद्र वानखडे, शुभम सिरसाट, कैलास भाऊ सिरसाट, रवी दाभाडे, शिलरत्न गवई ,दादाराव चोपडे, बंडू कळंबे , विशाल दांडगे, दिलिप दोळे , कुसुम दोळे , शोभा दाभाडे इ.सह असंख्य आंबेडकरी बांधव व महिला उपस्थित होत्या . तत्पुर्वी दीक्षाभूमी चरणीं वंदन केले



إرسال تعليق