खामगाव तालुक्यात बीज कोसळली; शेतकऱ्याचा मृत्यू

 खामगाव :- बुलडाणा जिल्ह्यात

आज सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असतानाच चार ठिकाणी विजा कोसळल्या. यात खामगाव तालुक्यातील पळशी बु येथील एक शेतकरी जागीच ठार झाला असून चौघे गंभीर जखमी आहेत. तसेच वेगवेगळ्या घटनेत दोन

बैलांचा सुद्धा वीज कोसळून मृत्यू झाला आहे.


खामगाव तालुक्यातील पळशी बु येथे वीज कोसळल्याने

मोहन श्रीराम सांगोकार  हे 34 वर्षीय शेतकरी जागीच ठार झाले तर केशव मिठुलाल सांगोकार हे जखमी झाले. दुसऱ्या

घटनेत मोताळा तालुक्यात चिंचपूर येथे वीज कोसळल्याने

कस्तुरबाई शालीग्राम मापारी (५०), शिवाजी शालीग्राम

मापारी (३०), आश्र्विनी शिवाजी मापारी (२५) हे कापूस

वेचण्यासाठी शेतात गेले असता अचानक वीज

कोसळल्याने ते जखमी झाले.

Post a Comment

Previous Post Next Post