गाझी फाउंडेशन खामगाव

 गाज़ी फाउंडेशनने रक्तदान करून जागतिक रक्तदान दिन साजरा केला



१ ऑक्टोबर हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.यावेळी गाज़ी फाउंडेशन खामगावच्या सदस्यांनी खामगाव शासकीय दवाखान्यातील रक्तपेढीला रक्तदान करून हा दिवस साजरा केला.  यावेळी शासकीय दवाखान्याचया डॉ.प्रणाली देशमुख (रक्त संक्रमण अधिकारी), गजानन देशमुख सर बलढाणा, राजश्री पाटील मॅडम (रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी), चित्रा देशपांडे मॅडम (रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी), शिंदे सिस्टर आणि अशोक पराते भाऊ उपस्थित होते.नेहमी सेवेसाठी उपस्थित राहिल्याबद्दल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी गाज़ी फाउंडेशनच्या सदस्यांचे आभार मानले आणि गाज़ी फाऊंडेशनचे अध्यक्ष जव्वाद अफज़ल खान यांनी गरजेच्या वेळी काम आलन्याबद्दल रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

यावेळी गाज़ी फाऊंडेशनचे जव्वाद अफज़ल खान (अध्यक्ष), अमानत कादरी (उपाध्यक्ष), दादू बेग (सचिव), ज़फर खान (उपसचिव), इम्रान खान (कोषाध्यक्ष), मोहम्मद मेमन, अबू तालिब, रेहान रज़ा, सिद्दीक हुसैन, हाफिज़ अरबाज़, जुनैद खान आणि सर्व सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم