भाजयुमो शहर अध्यक्ष राम मिश्रा यांचा वाढदिवस जनपयोगी उपक्रमांनी साजरा
हजारो चाहत्यांनी दिल्या प्रत्यक्ष भेटून , सोशल मिडीया व्दारे शुभेच्छा
खामगांव (का. प्र.) :- भारतीय जनता पाटी युवा मोर्चाचे खामगांव शहर अध्यक्ष, सा. वंदे रामराज्य चे मुख्य संपादक रामानुज मिश्रा उर्फ रामभाऊ यांचा वाढदिवस ०७ जुलै रोजी उत्साहात आणि जनपयोगी कार्यक्रम राबवून साजरा करण्यात आला. सर्व प्रथम लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचे स्मृतीस्थळावर जावून रामभाऊ मिश्रा यांनी त्यांना अभिवादन केले त्यानंतर सकाळी १० वाजता आ. अॅड. आकाशदादा फुंडकर यांनी सा. वंदेरामराज्य कार्यालय, भुसावळ चौक येथे येवून रामभाऊ मिश्रा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच त्यांचे उपस्थितीत केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला त्यानंतर आ. अॅड. आकाशदादा फुंडकर, भाजपा सोशल मिडीयाचे राज्य सहसंयोजक सागरदादा फुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली प्र. क्र. १३ मधील अंगणवाडी मधील २५ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप व अंगणवाडी सेविका यांना साडी वितरीत करण्यात आल्या. तत्पश्चात स्थानिक महात्मा फुले सामान्य रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप तसेच सामान्य रूग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
त्यानंतर रक्तदान शिबीरात ११ युवकांनी रक्तदान केले त्यामध्ये श्रीकांत जोशी, सोनू तिवारी, सोनू नेभवाणी, रोहन जैस्वाल, सर्वेश मिश्रा, विकास चवरे, अमन सलुजा, प्रसाद एदलाबादकर, गुरूप्रित चव्हाण, शशांक वक्ते यांचा समावेश होता. या कार्यक्रमाला खामगांव विधानसभा प्रमुख संजय शिनगारे, भाजपा खामगांव तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, खामगांव शहर अध्यक्ष चंद्रशेखर पुरोहित, वैद्यकिय अधिकारी डॉ. निलेश टापरे, भाजयुमो जिल्हा सरचिटणीस तथा माजी नगरसेवक राकेश राणा, माजी नगरसेवक महेंद्र रोहणकार, राजेंद्र धनोकार, गणेश जाधव, विजय उगले, भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, नगेंद्र रोहणकार, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष , भाजयुमो तालुकाध्यक्ष रूपेश खेकडे, माजी जि.प. सदस्य विनोद टिकार, विहिपचे विदर्भ प्रांत सहमंत्री अमोलभाऊ अंधारे, शांताराम बोधे, राजु तेलंग, विठ्ठल देशमुख, संतोष येवले, गजानन मुळीक, कृष्णा ठाकुर यांचेसह सर्व भारतीय जनता पाटीचे पदाधिकारी, भाजपा महिला आघाडी, भाजपा विद्यार्थी आघाडी, भाजयुमो चे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभाऊ मिश्रा यांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते
. सायंकाळी श्री हनुमान व्यायाम शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी रामकाका बोंद्रे, महेंद्र पाठक, रजपालसिंग चव्हाण,चंद्रकांत रेठेकर,नरेंद्र मावळे, गणेश जाधव, सुनील मोटे,पवन गरड, विलास खिरडकर, अमोल अंधारे, सोनु तिवारी, कृष्णा ठोसर, गोलु ठाकुर, विजय आनंदे, सर्वेश मिश्रा, पवन गरड, पवन पाठक, प्रतिक मिश्रा, सागर तायडे,अतुल सावळेकर,विक्की सारवान, शिव यादव,प्रतिक टाक, राहुल बरदिया, देशांक धुरंधर, हिमांशु सावलेकर, ओम पडोळे, प्रथमिश महाडीक, राहुल बिडकर, अतुल सावळेकर,शुभम ठाकुर, अमित बोहरा,गुरप्रित चव्हाण, करण बुंदेले, सागर तायडे, शुभम बुंदेले , सचिन सारसर, विपिन गरड, चेतन तायडे,पवन पाठक, शुभम ठाकुर, रोहित खंडेलवाल, शंतनु गोलाईत, युवराज यादव , रघु तिवारी , प्रथमेश महाडीक, सौरभ तिडतीडे व हनुमान व्यायाम शाळेचे जेष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी व कबड्डी संघाचे खेळाडू व मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते व सामान्य रूग्णालयातअभिषेक रोहणकार, प्रतिक मुंढे यांच्या वतीने शिवनेरी ग्रुपच्या माध्यमातून रूग्ण व त्यांचे नातेवाईकांना भोजन वाटप करण्यात आले.
राम मिश्रा हे सर्व धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सहभागी असतात त्यामुळे त्यांचा संपुर्ण मतदार संघात मोठा चाहता वर्ग असून शेकडो पदाधिकारी, चाहत्यांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच सोशल मिडीया, भ्रमणध्वनी व्दारे सुध्दा त्यांचेवर दिवसभर वाढदिवसानिमीत्त शुभेच्छांचा वर्षाव होत होता. शहरातील जवळपास १२ ते १३ प्रभागांमधील नागरीकांनी आपल्या परिसरात बोलावून त्यांना वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या.
आपल्या वाढदिवसानिमीत्त ज्यांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार रामभाऊ मिश्रा यांनी व्यक्त केले आहे. सर्व कार्यक्रमांचे यशस्वीतेकरीता योगेश आळशी, पांडुरंग काळे, विनय पंडा शर्मा, आकाश बडासे, पंकज सरकटे, श्री देशमुख, नितीन पोपळे, प्रसाद एदलाबादकर, हितेश पदमगीरवार, श्रीकांत जोशी, प्रितम चव्हाण, विक्की रेठेकर, नानकसिंग चव्हाण, पवन डिक्कर, संदिप राजपूत, विक्की चौधरी, कमलेश हवेलिया, यश आमले, रमेश इंगळे, सुनिल धंदर, अॅड. दिनेश वाधवाणी, योगेश खत्री, संजय भागदेवाणी, आशिष सुरेका, विक्की हट्टेल, बंटी चौकसे, कुशक तायडे, संजय गुप्ता, मिथीलेश पांडे, हरिष रेठेकर, मयुर भंवर, अभिलाष मुर्हे, अभिनव मुर्हे, विजय आनंदे, राम शिंदे, गजानन कळमकार, अमोल राठोड, सतिष इंगळे, प्रसन्न पिसे पाटील, वानखडे, अभिषेक पिंपळकार, आकाश मिश्रा, आकाश शेळके, अमोल खिरडकर, चेतन ठोंबरे, अतुल माहुरकर, अविनाश कोल्हे, बंटी खंडेलवाल, दत्ता जवळकार, दया कारंजकर,निकुंज मंदानी, दिपांशु भैय्या, गणेश कोमुकर, मंगेश सावरकर, मयुर घाडगे, मुन्ना पेसोडे, पवन झापर्डे, पवन तनपुरे, राज पाटील, पवन ठाकुर, रोशन गायकवाड, राहुल जाधव, संतोष गुरव, श्रीकांत टाले, सोनु कदम आदी पदाधिकार्यांनी सहकार्य केले.





إرسال تعليق