खामगाव:- स्पंदन गौतम डोंगरदिवे यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.संतोष तायडे जि. प्रमुख शिव उद्योग सहकार सेना जि. बुलढाणा यांनी खामगाव येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटप करण्याचा मौल्यवान कार्यक्रम हाती घेतला. सदर कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख श्री सुभाष जी ठाकूर, तालुकाप्रमुख श्री विजय बोदडे, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. श्रुतीताई पतंगे, उपशहर प्रमुख श्री सुरेश लोखंडे, शहर संघटक श्री दिनेश पतंगे, मान. सोहम धुरंधरे, मान. नरेंद्र शेगोकार, मान. दिलीप वाकोडे ,मान. आशिष वाकोडे, संतोषजी रानेकर, विशाल धुरंधर, महिला आघाडीचे शहर प्रमुख ज्योतीताई तारापूर, उपतालुकाप्रमुख सुरेखाताई चिलवण , महिला आघाडी उपशहर प्रमुख सौ प्रेरणा खराडे, शाखाप्रमुख नंदा दुबे, शाखाप्रमुख गंगाबाई भट्टड. उपशहर प्रमुख बबीता ताई हट्टेल, तसेच बरेच शिवसैनिक उपस्थित होते विशेष म्हणजे कार्यक्रमाला मा.डोंगरदिवे साहेबांच्या आईसाहेब सौ जिजा ताई डोंगरदिवे ,व त्यांचे काकासाहेब उपस्थित होते. उपस्थित सर्वांच्या हस्ते फळे व बिस्किट रुग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना वाटप करण्यात आले.
![]() |
| जाहिरात |


Post a Comment