देवीच्या नावाने असलेल्या कॅफेमध्ये असभ्य वर्तन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची बेधडक कारवाई!
३ मुले व ३ मुलींना दिले आई-वडिलांच्या ताब्यात!
मलकापूर- हनुमान रोडवरील कॅफेमध्ये असभ्य वर्तन करणारे ३ मुले ३ मुली अशा ६ जणांना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर १६ ऑक्टोबर रोजी कारवाई केली.
तुमच्या कॅफेमध्ये समाज स्वास्थ बिघडवणाऱ्या, लाजिरवाणे असे अनुचित प्रकार चालत असतील तर तुमच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल तसेच समाजातील सर्व नागरिकांना सुद्धा पोस्टे मलकापूर शहर तर्फे आवाहन करण्यात येते की तुम्हाला सुद्धा असे अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास आमच्या निदर्शनास आणून द्यावे.याबबात अधिक माहिती अशी की, पंचमुखी रोडवर असलेल्या सप्तशृंगी कॅफेमध्ये दुपारच्या दरम्यान शाळेतील व कॉलेजमधील मुलं-मुली असभ्य वर्तन करीत असल्याची माहिती पोलिस निरिक्षक विलास पाटील यांना मिळाली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी स्मिता म्हसाये, ज्ञानेश्वर मुळे, प्रियंका डहाके, संतोष कुमावत, ईश्वर वाघ या पोलीस कर्मचाऱ्यांनी सदर कॅफेवर धडक देत कॅफेमध्ये जाऊन असभ्य वर्तन करणाऱ्या ३ मुलांना व ३ मुलींना ताब्यात घेतले. त्यांचेवर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येऊन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.
Post a Comment