आदर्श शिक्षिका  सौ. कल्पना उपर्वट खामगांव अर्बन बँकेच्या संचालकपदी अविरोध



खामगांव :- येथील जी. वि. मेहता नवयुग विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षिका सौ कल्पना पुरुषोत्तम उपर्वट यांची दि खामगांव अर्बन मल्टी शेड्युल बँकेच्या महिला राखीव गटामधून अविरोध निवड झाली आहे. सौ. कल्पना उपर्वट ह्यांनी शिक्षिका म्हणून ३८ वर्ष प्रदीर्घ सेवा केली असून त्यांना स्व. बावस्कर गुरुजी आदर्श पुरस्कार प्राप्त झाला असून सुरभी महिला मंडळाच्यावतीने सुद्धा त्यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी सेवानिवृत्तीनंतर पाली भाषा विषयात पदवित्तोर पदवी प्राप्त केली असून त्यांचा पीएचडी करण्याचा मानस आहे. त्या अत्यंत मनमिळाऊ व  सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आहेत.  त्यामुळेच त्यांची अविरोध निवड झाली आहे, हे विशेष. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post