*आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मातंग समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार आयोजित* 


खामगांव : जनोपचार न्यूज नेटवर्क :- सहित्यरत्न अण्णाभाऊ  साठे सोशल फोरम युवा आघाडी जिल्हाध्यक्ष कृष्णा नाटेकर यांच्या अध्यक्षतेखाली 4 मार्च रोजी घेण्यात आलेल्या बैठकीमध्ये खालील प्रमाणे कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले  त्यानुसार आंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त मातंग समाजातील विविध क्षेत्रात कर्तृत्ववान आसलेल्या महिलांच्या सत्काराचा कार्यक्रम दिनांक 8 मार्च रोजी दुपारी 12:00 वाजता कृषि उत्पन्न बाजार समिती स्व.विलास रावजी देशमुख कृषी संकुल (t.m.c.) हॉल अकोला रोड खामगांव येथे आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरम महीला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. सुमनताई भास्करराव आघाम या राहतील कार्यक्रमाला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सोशल फोरमचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच याठिकाणी सहित्यरत्न अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, विशेष घटक योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना,  रमाई घरकुल योजना, पंतप्रधान आवास योजना, राशन कार्ड पासुन वंचित असलेल्या कुटुंबाला राशन कार्ड मिळण्याकरिता माहिती देण्यात येईल, इत्यादीसह शासनाच्या अनुसूचित जातीच्या विकासाकरिता असलेल्या विवीध योजना बाबत माहिती देण्यात येईल, या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे

Post a Comment

Previous Post Next Post