जिल्हाधिकारी यांना मनसेचे निवेदन बंद केलेल्या तेरा घंटागाड्या पुन्हा सुरू कराव्या
खामगाव शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचे बिल अदा करण्यात येऊ नये तसेच संबंधित कंत्राटदाराला पाठीशी घालणाऱ्या खामगाव न.प. मुख्याधिकारी प्रशांत शेळके सह आरोग्य विभागातील सौ.प्राजक्ता पांडे,अनंता निळे व ठेकेदाराचे बिले काढणारे ऑडिटर यांच्या वर कार्यवाही करुन त्यांना सेवेतून कमी करावे या मागणीसाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना खामगाव च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देण्यात आले यावेळी शहराध्यक्ष आनंद गायगोळ, शहर उपाध्यक्ष आकाश पाटील सह मनसे घंटागाडी कामगारांचे अध्यक्ष विनोद इंगळे, विक्की शिंदे, निखिल मांगले उपस्थित होते .

إرسال تعليق