सिल्वरसिटी मल्टिस्पेसिऍलिटी हॉस्पिटल, खामगाव मध्ये "जागतिक महिला दिन" उत्साहात साजरा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :- बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठया व एकाच छताखाली सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेल्या एकमेव अश्या सिल्वरसिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, क्रिटिकल केअर व ट्रामा सेंटर, खामगाव येथे शुक्रवार दि ०८ मार्च २०२४ रोजी "जागतिक महिला सन्मान दिन " मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सिल्वरसिटी हॉस्पिटल चे अध्यक्ष डॉ अशोक बावस्कर, व्यवस्थापकीय संचालक डॉ पंकज मंत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ पराग महाजन, उप मुख्य कार्य कारी अधिकारी डॉ गौरव लदढा, संचालक डॉ निलेश तिबडेवाल, डॉ गौरव गोयंका, डॉ आनंद राठी, भागधारक डॉ. अनुप शंकरवार यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांचे हस्ते द्विप प्रज्वलन व धंवन्तरी पुजनाने करण्यात आली. प्रशासकीय अधिकारी निलेश बैरागी यांनी सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे प्रस्तविक केले.जागतिक महिला दिना चे औचीत्य साधून दर दोन महिन्या तून रुग्ण सेवेचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणारा इम्प्लोयी ऑफ दि मंथ चे पारितोषिक व प्रशस्तिपत्र या वेळी ड्युटी डॉकटर्स, नर्सिंग स्टाफ, ऑफिस स्टाफ, तंत्रज्ञ, आया बाई, सेक्युरिटी व स्वछता महिला कर्मचार्यांना देऊन सन्मानित करण्यात आले. सोबतच सिल्व्हर्सिटी हॉस्पिटल तर्फे उपस्थित सर्व महिला कर्मचार्यांचे भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ अशोक बावस्कर यांनी "जागतिक महिला सन्मान दिना " चे महत्व, सुरुवात, त्यामागील अभिप्रेत असलेला हेतू तसेच स्त्रियांचे वैद्यकीय, सामाजिक, औदयोगिक, शक्षणिक, अभियांत्रिकी व राजकारण या क्षेत्रातील योगदान या बद्दल विस्तृत माहिति दिली.या प्रसंगी उपस्थित डॉ अपर्णा बावस्कर, डॉ दीपा मंत्री, डॉ रुपाली महाजन, डॉ मंजुश्री तिबडेवाल, डॉ श्रुती लद्धा, डॉ प्रतिमा राठी, डॉ समृद्धी मेंढे, डॉ वैशाली चरखा, डॉ पूजा तेरेदेसाई यांचाही भेटवस्तु व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
![]() |
| जाहिरात |
हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ पंकज मंत्री यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास सिल्वरसिटी हॉस्पिटलचे सर्व महिला कर्मचारीने सहभाग नोंदविला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. जया इंगळे, योगिता घरत, श्री निलेश बैरागी व सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.




إرسال تعليق