अंजुमन हायस्कूलमध्ये माजी  विद्यार्थ्यांचा गेट टु गेदर कार्यक्रम संपन्न

 खामगाव(जनोपचार) :- अंजुमन हायस्कूल व ज्युनिअर कालेज खामगाव  येथे  मात्र सेकंडरी ची 1975 च्या बॅच चा  माजी विद्यार्थ्यांचा गेड टु गेदर कार्यक्रम  16 एप्रिल 2024 रोजी संपन्न झाला  सन 2023 मध्ये अंजुमन संस्थेला 100 वर्षे पूर्ण झाले आहेत. अंजुमन हायस्कूलच्या 1975 च्या बॅच ने संस्थेच्या 100 व्या वर्षाचा जल्लोषाचा पहिला कार्यक्रम आयोजित करून सुरुवात केली होती सन 1975 च्या आजच्या 49 व्या वर्षीय या कार्यक्रमास मुंबई , औरंगाबाद, बुलढाणा, अकोला, नांदुरा, वडनेर भोलजी , गोंधनापूर ,कंझारा  आदी गावातील  मित्रमंडळी उपस्थित होती. जयहिंद  वेल्डिंग अण्ड बॉयलर रिपेअर वर्क्स  व अल्फा बॉयलर्स मुंबई  चे संचालक ताजुद्दीन दाऊद हमदुले यांनी आयोजित आपल्या  मित्रांच्या आरोग्य ची काळजी करुन अवध्या काही मिनिटांतच निर्णय घेऊन ब्लड टेक्निशीयन ला बोलावून अधिकांश मित्रांचे ब्लड नमुने घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली या तपासणीत लिपिड प्रोफाइल , लिव्हर फंक्शन प्रोफाइल , किडनी बेसिक स्क्रीन मॅप प्रोफाइल , थायराइड प्रोफाइल II , गुलोकॉजीलाईटेड हो हिमोग्लोबिन कॅल्शियम आणि फॉस्फोरस व कम्प्लीट ब्लड अकाउंट चा समावेश आहे या मोहम्मद युसूफ इब्राहिम, , अब्दुल सत्तार , मोहम्मद फैजुल्लाह,  सैय्यद समीर सर , मो आसिफ , आदी प्रामुख्याने उपस्थित होते.या अविस्मरणीय कार्यक्रमात सर्व प्रथम या एका वर्षात प्रोफेसर सैय्यद कैय्युम (खामगाव) , मित्र मंडळी पैकी जमील अहमद (खामगाव) , जफर उल्लाह खान  (मुंबई) , मोहम्मद इद्रीस (मुंबई) व मोहम्मद सलीम (अकोला ) यांचे निधन झाले म्हणून या सगळ्याना खराज ए अकीदत देत त्यांच्या साठी दुआ मांगितले 

या वेळी इब्राहिम खान हे या वर्षी हे करण्यासाठी जात असल्याने त्याचा बुके  पुष्प देऊन सत्कार करण्यात आले तसेच सर्व मित्रांच्या वतीनेअल्फा बायलर चे संचालक वआपल्या लाडक्या व घनिष्ठ मित्र ताजुद्दीन हमदुले चा सुध्दा पुष्प बुके देऊन सत्कार करण्यात आलेया कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परवेज खान सर  , माजिद खान. मोहसीन खान , मोहम्मद  तारीक , मोहम्मद फहद  , मोहम्मद अम्मार  , मोहम्मद यासीर ,जफर शाह ,  आदींनी परिश्रम घेतले संचालन इब्राहिम खान यांनी केले




Post a Comment

أحدث أقدم