35000 ची लाच घेताना तहसीलदार वाहन चालक आणि शिपाई लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

 सखारखेरडा जनोपचार न्यूज नेटवर्क - सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयात रेतीचे ट्रॅक्टर सुरू करण्यासाठी 35000 लाच घेताना तहसीलदार व वाहन चालक आणि शिपाई यांना लाच लुचपत विभागाने  पकडून गजाआड केल्याची घटना सिंदखेडराजा तहसील कार्यालयात दिनांक 12 एप्रिलला दुपारी दोन वाजता घडली या घटनेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे

लिपिक फरार -लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई होताच तहसीलदार यांचे लिपिक महादेव जवंजाळ हे लगेचच फरार झाले. वास्तविक पाहता जवंजाळ हे रेती घाटाची वसूली करायचे दरम्यान आता एलसीबी जवंजाळ यांचेवर काय कारवाई करणार हे चौकशी अंती कळेल.

    या बाबत सविस्तर माहिती अशी की,  हनवतखेड येथील एका  व्यक्तीने अवैध रेती वाहन   ट्रॅक्टर सुरू करण्यासाठी तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्याकडे परवानगी मागत होते त्यानुसार ट्रॅक्टर सुरू करायचे असेल तर तहसीलदार सचिन जयस्वाल यांनी तीस हजार रुपये मला आणि पाच हजार रुपये चालक मंगेश कुलथे यांना द्यावे लागतील असे सांगितले  त्यानुसार  पैसे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी बुलढाणा लाचलुचपत विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली त्यानुसार दुपारी पैसे देताना बुलढाणा  विभागाने पोलीस निरीक्षक सचिन इंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तहसीलदार यांच्या केबिनमध्ये सापळा रचला तहसीलदार सचिन जयस्वाल वाहन चालक मंगेश कुलथे आणि शिपाई पंजाब ताठे यांना  पकडून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

जाहिरात

तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्या अनेक तक्रारी रेती उत्खनन प्रकरणी तहसीलदार सचिन जयस्वाल यांच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या रेतीचे अवैध उत्खनन मोठ्या प्रमाणात होते  तहसीलदार पैसे घेत होता अशी तक्रार असल्याने धाड पडताच तहसीलदार सचिन जयस्वाल यांचे राहते घर परभणी येथे देखील लातूर विभागाची पथक रवाना झाली आहे असून झाडाझडती सुरू आहे. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने आज तहसील मधील कामकाज बंद होते.





Post a Comment

Previous Post Next Post