जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर ज्युनिअर अँड सिनिअर कॉलेज  आवार येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्स अँड गुंजकर कॉलेज आवार येथे १३३ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा.रामकृष्ण गुंजकर सर व सचिवा प्रा.सौ.सुरेखाताई गुंजकर ,याशाळेचे मुख्याध्यापक देविदास जाधव सर तसेच उपमुख्याध्यापक  अल्हाट सर यांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देऊन या महान महामानवाने समाजामध्ये सर्वात मोठे परिवर्तन घडवून आणले.असे शब्द श्री.गुंजकर सरानी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. कार्यक्रमाला .विवेक ब्राम्हणे ,.विशाल घोडके.मंगेश मोरे,.अजित जाट, .प्रशांत बंड, सौ.शीतल ठाकरे,सौ.ज्योती मोरे, सौ.सीमा डाबरे,कु.अंकिता देशमुख,सौ.पूनम देवचे ,सौ.ज्योतिका शेलकर ,कांचन लोखंडे,वर्षा मोरे,जयश्री संजोरे,देशमुख मॅडम ,मंदाताई तायडे ,तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच बस मालक व चालक वर्ग उपस्थित  होते.



Post a Comment

Previous Post Next Post