अवैध रेतीवाल्यांची हिंमत वाढली... ट्रॅक्टर ने कोतवालास चिरडले, कोतवाल यांचा मृत्यू
संग्रामपूर:- तालुक्यात अवैध वाळू तस्करी करणारे सक्रिय झाले आहेत. वाळू तस्करांनी दिनांक 16 एप्रिल रोजी रात्री 9.30 च्या दरम्यान कोतवालास चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहिती नुसार काटेल कोलद वाण नदीपात्रात रेती उपसा सुरू असल्याची माहिती संबंधित महसूल पथकाला मिळाली होती वान नदीच्या पुलाजवळ तलाठी व त्यांचे सहकारी ट्रॅक्टर पकडण्यास गेले असता ट्रॅक्टर चालकाने कोतवाल लक्ष्मण अस्वार वय अंदाजे(34) रा एकलारा यांच्या पायावरून ट्रॅक्टर नेले. तेथे उपस्थित कोतवाल अस्वार यांना वरवट बकाल ग्रामीण रुग्णालय दाखल केले. परंतु परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले. अकोला येथील मेन हॉस्पिटल येथे त्यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. कोतवाल यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली यामुळे सर्व तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून नागरिक संतप्त झालेले दिसत आहे. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले . या घटनेतील ट्रॅक्टर मालक व चालक फरार झाले असून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे . पुढील तपास तामगाव पोलीस करीत आहे
.jpg)
Post a Comment