मोठी देवी सेवाधारी मंडळातर्फे रामनवमी निमित्त निघालेल्या शोभा यात्रेचे भव्य स्वागत व शरबत वितरण
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: रामनवमी निमित्त शहरातून विशाल शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठी देवी सेवाधारी मंडळातर्फे अध्यक्ष उत्तमराव काका उंबरकर यांच्या मार्गदर्शनात भाविकांना शरबताचे वितरण करण्यात आले, तसेच दुपट्टा पुष्पगुच्छ देऊन राम नवमी उत्सव समिती खामगाव च्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले। सर्वप्रथम शोभायात्रेचे आगमन होताच मोठ्या प्रमाणात आतिषबाजी करून ढोल ताशांच्या निनादात पालखीचे स्वागत करण्यात आले, व नंतर सेवाधारी मंडळाचे सेवाधारी अशोक भाऊ आनंदे यांच्या हस्ते पालखीत विराजमान आराध्य देव प्रभू श्रीरामचंद्र यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले
यावेळी राजस्थानी ब्राह्मण समाजाचे जेष्ठ मोहन काकाजी शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती,तसेच सेवाधारी मंडळाचे ज्ञानेश्वर वाशिमकर,रवि आनंदे, दिलीप माडीवाले, कैलास आनंदे, टिनू एपुरे, रमेश काकडे, विनोद फुलारे, शाम गलांडे, गोलू किल्लेकर, अनुप सिंह चव्हाण, रवि जोशी, रघु काळे, निना मांडवेकर, पंकज जैन, हेमंत गोहेल, अरुण गायकवाड, दिलीप अगीनकर, संजीव अगिनकर, गणेश परदेशी, संदीप बोदडे, जितेंद्र मेहरा,रुद्र जोशी सह मोठी देवी सेवाधारी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते


Post a Comment