![]() |
| "जन्मोत्सव विशेष" |
!! महाप्रतापी,भृगकूलवंदन राज राजेश्वर भगवान परशुराम !!
“जय परशुराम”
राज राजेश्वर भगवान परशुराम हे विष्णुंच्या अवतारापैकी सहावे अवतार मानले जातात, जनदग्नी नामक ऋषी हे त्यांचे पिता व रेणुका हि त्यांची माता, वैशाख शुध्द अक्षय तृतीयाच्या दिवशी नर्मदा नदीच्या तिरावर जमदग्नी ऋषीच्या आश्रमात परशुरामांचा जन्म झाला.परशुरामांनी बाल्य अवस्थेतच पित्याकडुन वेदविद्येचे ज्ञान मिळविले व घोर तपस्या करुन भ.शंकरांना प्रसन्न केले।भ. शंकरांकडुन त्यांनी शस्त्र विद्या घेतली,भ.शिव यांनी त्यांच्या तपस्येचे फल म्हणुन वरदान स्वरुपात त्यांना परशु नामक शस्त्र दिला.व येथुनच त्यांचे नांव परशुराम असे जग प्रसिध्द झाले।
अनेक वेळा पृथ्वीवर दृष्ठप्रवृत्तींचा उन्मत झाला असता त्या प्रवृत्तींपासुन पृथ्वीच्या रक्षणार्थ,प्रजेचा जाच करणाऱ्यांचे नाश करणारे महाप्रतापी,प्रकांडपंडित, सुर्यासम तेजस्वी, श्रेष्ठ, धर्नुधर, परमगुरु, पृथ्वीतारक, महादनी, आराध्य भ. परशुराम यांच्या जन्मोत्सोवानिमित्त सर्वप्रथम त्यांच्या चरणी कोटी-कोटी नमन.
![]() |
| जाहिरात |
भगवान परशुराम यांच्या जिवनापासुन आपण अनेक गुणांचा बोध घेऊ शकतो त्यांनी सर्व ब्राम्हण कुळांना संघटीत करुन त्यांना वास्तव्यही दिले व अनेक उन्मत झालेल्या दृष्ट प्रवृत्तीपासुन पृथ्वीचे रक्षण करुन ब्राम्हणांचे स्थान काय आहे हे जगाला दाखवुन दिले। म्हणजेच आज आपण संघटीत राहणे गरजेचे आहे।एकमेकास मदतीचा हात देऊन आपसातील मतभेद विसरणे गरजेचे आहे। रात्रंदिवस समाज हितासाठी झटणाऱ्या, व जीवाचे रान करणाऱ्यांचे बलीदान व योगदान आपण कोणाकडुनही दिशाभुल होऊन विसरता कामा नये।
ब्राम्हण समाज हा स्वकर्तत्वावर ,मेहनीतीने, परीश्रमाने ,प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे। शिवशिष्य भ.परशुराम ह्यांच्या जन्मोत्सवाच्या पावन पर्वावर ब्रम्हवृंदाची एकासी वज्रमुठ तयार व्हावी,आणि समाज ,धर्म विरोधी,राष्ट्रविरोधी तत्वांवर तिने जोरदार प्रहार करावा व केवळ संख्याबळात हि एकी न ठेवता गुणतमक व बुध्दीमता, एकतेचे प्रकटीकरण या माध्यमातुन व्हावे,भ.परशुराम हे ब्राम्हणत्वाचे प्रतिक आहे। त्यांचे चरीत्र ब्राम्हण समाजाला आत्मबळ प्राप्त करुन देणारे व प्रेरणादायी आहे.भ.परशुराम हे अन्याय विरुध्द चिड निर्माण करणारे व अन्यायाचे प्रतिकार करण्याची शिकवण देणारे जीवन जगले.म्हणुन विद्या व शौर्य या दोन्हींचा अपुर्व संगम परशुरामांच्या अंगी आढळतो. धर्मतत्व व निती मुल्यांच्या रक्षणासाठी वेळ पडल्यास शास्त्रासोबतच शस्त्र देखील वापरण्याचा संदेश भ.परशुरामांनी दिला।
भ.परशुराम यांच्याकडुन त्यांनी दिलेली शिकवण आपण आपल्या जिवनात आत्मसात केली पाहिजे,भ. परशुरामांचा परशु शौर्याचे व ताकतीचे प्रतिक होय.
गेल्या काही काळापासून ब्राम्हण समाज हा एका संक्रमित अवस्थेतुन जात आहे.वेळोवेळी धर्मविरोधी तत्वांकडुन गरद ओकल्या जात आहे. कारण ब्राम्हण समाज हा अनादी काळापासुन सनातन धर्माचा पाया राहिलेला आहे. धर्माचा प्रचार व प्रसार करणे हेच उद्देश समोर ठेवुन नेहमी कार्यरत असतो. व नेहमी हिच बाब ह्या धर्मविरोधी शक्तींना खटकत आसते.
आज आपण कोणत्याही स्थितीत एकोप्याने मार्गक्रमण करुन जीवनात यश प्राप्त करावे. तसेच येणाऱ्या पिढीला प्रेरणादायी ठरेल असा समाजनिर्माण करावा, विपरीत परिस्थितीत, काळात, संकटांना निश्पात करुन विजयश्री संपादन करण्यासाठी भगवान परशुरामांचे चरीत्र हे निश्चितच प्रेरणादायी आहे.
जय श्री राम।जय परशुराम।
आपला नम्र
![]() |
| रवि जोशी मो.9373575707.सराफा खामगांव |



Post a Comment