रस्ता झाला चांगला....पण पॅच तसाच ! वाहनधारक आलेत मेटाकुटीस

खामगाव: नितेश मानकर :- शहरातून वाडीकडे जाणारा रस्ता नव्यानेच बांधण्यात आला. मात्र, सुरूवातीचा डांबर रस्ता आणि नवीन झालेल्या सिमेंट रस्त्यातील पॅच तसाच ठेवण्यात आल्याने खामगाव जलंब रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढीस लागले आहे. शिवाय वाहन धारकांना वाहन चालवितांना चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे.

याबाबत सविस्तर असे की, खामगाव शहरातून वाडी मार्गे जलंबकडे जाणार्या नानानानी पार्कसमोरील रस्त्याचे बांधकाम काही महिन्यांपूर्वीच करण्यात आले. रस्ता बांधकामादरम्यान जी.एस.कॉलेज  मार्गे नांदुरा रोडवर वळविण्यात आला होता. काही दिवसांपूर्वीच या रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले. मात्र, रस्त्यावरील नाना पार्क जवळ सिमेंट रस्ता आणि जलंब नाक्याकडील डांबरी रस्त्याच्या मधात पॅच जैसे थे ठेवण्यात आला. 

...... जाहिरात.....


या पॅचमध्ये मुरूमाचे मोठे मोठे दगड असल्यामुळे वाहने आदळून अपघात होत असल्याचे दिसून येते. त्याचवेळी काही दुचाकीही येथे स्लीप होत आहे. परिणामी, दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून आपली वाहने चालवावी लागत आहेत. तर तीन चाकी आणि चार चाकी वाहन चालकही यामुळे चांगलेच मेटाकुटीस आले आहेत. गत अनेक दिवसांपासून अर्धवट सोडलेल्या या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांसाेबतच विद्यार्थ्यांनाही चांगलाच त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, सबंधित विभागाचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.





Post a Comment

Previous Post Next Post