*जेसीआय खामगाव जय अंबे च्या वतीने मतदार जनजागृती अभियान संपन्न*
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- मतदारांना जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करण्याकरिता जेसीआय खामगाव जय अंबे च्या वतीने खामगाव शहरातील मुख्य चौकां मधे विविध प्रबोधनात्मक आशय लिहिलीले फलक घेऊन जेसीआय खामगाव जय अंबे चे पदाधिकारी उभे राहिलेभारत देशाचा सर्वात मोठा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच लोकसभा निवडणूक मतदान मध्ये सहभागी होण्याकरिता शहरातील मतदारांना महिला मतदारांना व विशेष करून नव मतदारांना उत्साह यावा व त्यांनी या लोकशाहीच्या पर्वात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा या उद्देशातून जेसीआय खामगाव जय अंबे या संस्थेच्या वतीने मतदान करा ,उद्या सुट्टीचा नाही तर जबाबदारी पार पाडण्याचा दिवस आहे ,देशाच्या कल्याणासाठी मतदान करा ,संपूर्ण परिवारासोबत मतदान करा असे मजकूर लिहिलेले मोठे फलक हातात धरून शहरातील स्वामी समर्थ संकुल समोर ,जळंब नाका चौक ,टावर चौक ,बस स्टँड चौक ,टिळक पुतळा चौक ,महावीर चौक ,फरशी सह संपूर्ण शहरातील प्रमुख रस्त्यावर जेसीआय खामगाव जय अंबेचे पदाधिकारी मतदानाच्या आदल्या दिवशी रस्त्यावर उभे होते.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यांमध्ये कमी झालेली मतदानाची टक्केवारी बघून संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या खामगाव शहरात जास्तीत जास्त मतदान व्हावे या प्रामाणिक उद्देशाने या प्रकल्पाचे नियोजन केले होते उन्हाळा असल्यामुळे सकाळी लवकर किंवा संध्याकाळी पण सहा वाजेच्या आत आपल्या मतदान केंद्रावर पोचून स्वतः मतदान करावे यासोबतच आपल्या परिवारातील, मित्रपरिवारातील सर्व सदस्यांसहित् मतदान अवश्य करावे अशी विनंती संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांना केली जेसीआय खामगाव जय अंबे संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत आम्ही मतदानासाठी अवश्य जाऊ अशे शहरातील मुख्य चौकात उपस्थित नागरिक आपसात बोलत हॊते. तसेच रस्त्यावरून येणारे जाणारे वाहन चालकसुद्धा बेस्ट ऑफ लक असा हाताने इशारा करत या उपक्रमाचा समर्थन करत होते यावेळी जेसीआय खामगाव जय अंबे चे प्रणेते जेसी डॉ भगतसिंग राजपूत, संस्थेचे अध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयनका, सचिव जेसी एडवोकेट दिनेश वाधवाणी, जेसी डॉ शालिनी राजपूत, जेसी कौस्तुभ मोहता, प्रकल्प प्रमुख जेसी योगेश खत्री, जेसी डॉ कोमल गोयनका, जेसी कोमल भिसे, जेसी निष्ठा पूरवार, जेसी रोहन जैस्वाल, जेसी डॉ आनंद राठी, जेसी राहुल नोतानी, जेसी रोशन गनवाणी, जेसी कुणाल भिसे, जेसी विन्नी मोहणानी, जेसी विशाल गांधी, जेसी श्रेणिक टिंबाडिया, जेसी डॉ अनुप शंकरवार, जेसी करण डिडवानिया सह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Post a Comment