जेसीआय खामगाव जय अंबे च्या वतीने शहरात १२ ठिकाणी गौ माता प्याऊ चे वितरण
खामगाव शहरातील उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढतच चालला असून या उन्हात शहरातील गायी सहित सर्व मुक्या जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. या गायींना व जनावरांनां दररोज पिण्यासाठी पाणी मिळावे या प्रामाणिक उद्देशाने जेसीआय खामगाव जय अंबे तर्फे खामगाव शहरात १२ ठिकाणी गौ प्याऊ चे वितरण पूर्ण करण्यात आले.
दिनांक ०६ मे पासून १० मे दरम्यान सिल्व्हरसिटी हॉस्पिटल समोर, डॉ थेटे यांच्या हॉस्पिटल समोर, जलंब नाका येथे डॉ राजपूत यांच्या हॉस्पिटल समोर, चांदमारी येथे डॉ शंकरवार यांच्या हॉस्पिटल समोर, घाटपुरी नाका येथे ऍड रितेश निगम यांच्या घरासमोर, वाडी येथे सौ जया इंगळे यांच्या घरासमोर, सिविल लाईन्स येथे श्री परेश खत्री यांच्या घरासमोर, अमृतबाग तलाव रोड येथे श्री राम मिश्रा यांच्या घरासमोर, श्री अपूर्व देशपांडे यांच्या घरा समोर, केला पोस्ट ऑफिस जवळ श्री केला यांच्या घरा समोर, डी पी रोड येथे श्री सुरज अग्रवाल यांच्या घरा समोर, बालाजी प्लॉट येथे श्री गोयनका यांच्या घरा समोर अश्या सर्व ठिकाणी जागा ठरवून जेसीआय खामगाव जय अंबे च्या सदस्यांनी स्वतः उपस्थित राहून या गौ प्याऊ ला ठेवायची व दररोज या गौ प्याऊ मध्ये ताजे स्वच्छ पाणी टाकण्याची विनंती वरील सर्व मान्यवरांना केली.
या प्रकल्पाची प्रमुख जेसी सुरभी गोयनका यांनी हे गौ प्यायु बनवण्याचा व प्रत्येक ठिकाणी पोहोचवण्याचा संपूर्ण खर्च स्वतः केला. या कामासाठी त्यांना श्री स्नेहील गोयनका व श्री आदित्य खंडेलवाल यांचे बहुमूल्य सहयोग प्राप्त झाले. गौ प्याऊ बसवण्याच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने एक चांगली सामाजिक जबाबदारी पार पाडली याकरिता वरील सर्व मान्यवरांनी प्रकल्पप्रमुख समवेत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत हा गौ प्याऊ दररोज भरण्याचे शब्द दिले. यावेळी मुक्या जनावरांकरिता हा चांगला उपक्रम राबविण्यासाठी जेसीआय खामगाव जय अंबे च्या सर्व उपस्थित पदाधिकाऱ्यांचा श्री राम मिश्रा यांच्यातर्फे पुष्पगुच्छ व भगवा दुपट्टा देऊन छोटेखानी सत्कारही करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता प्रणेते जेसी भगतसिंग राजपूत, अध्यक्ष जेसी डॉ गौरव गोयनका, सचिव जेसी एडवोकेट दिनेश वाधवाणी, जेसी डॉ शालिनी राजपूत, जेसी डॉ कोमल गोयनका, जेसी अपूर्व देशपांडे, जेसी कौस्तुभ मोहता, जेसी एडवोकेट रितेश निगम, जेसी योगेश खत्री, जेसी रोहन जैस्वाल, जेसी निष्ठा पूरवार, जेसी चेताश्री शंकरवार, जेसी प्रीती देशपांडे जेसी डॉ अनुप शंकरवार, जेसी अमोल घवाळकर, जेसी विशाल गांधी, जेसी आशिष मोदी, जेसी राहुल नोतानी, जेसी करण डिडवाणी, जेसी सुशांत घवाळकर सह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.




Post a Comment