मुंबईच्या दोघी... बुलढाणा जिल्ह्यातील सहा जण... शेगावच्या अड्ड्यावरून ताब्यात


शेगाव : शहरा नजीक जवळा रोडवर सुरू असलेल्या एका देहव्यापरच्या अड्ड्‌यावर स्थागुशाने मारलेल्या छाप्यात २ युवतींसह ६ जणांना ताब्यात घेण्यात आल्याची घटना ८ मे रोजी दुपारी २.३० वाजता घडली.

स्थानिक जवळा रोडवरील एका पेट्रोल पंपा मागे असलेल्या घरात देहव्यापार सुरू  असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलिसांनी छापा मारला असता. शहरातील काही इसम आर्थिक फायद्यासाठी मुंबई येथील दोन युवतींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापार करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसून आले. याठिकाणी पोलिसांनी प्रेम लहाने रा. जवळा, सुमित जाधव रा. रामदेवबाबा नगर शेगाव, अमोल बांगर वय २१ रा. बावनबिर ता. संग्रामपूर, यांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. तसेच 'त्या' खोलीची झडती घेतली असता सागर अनिल सारवान याच्यासह कल्याण जिल्हा ठाणे येथील २७ वर्षीय पिडीत युवती व मुंब्रा जिल्हा ठाणे येथील २१ वर्षीय युवती आढळून आली. दोन्ही युवतींकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्यानी कल्याण येथील एका महिलेने शेगाव येशील एका इसमाचा नंबर देऊन देहव्यापारच्या अनुषंगाने बोलने झाले व ५ मे रोजी त्यांनी शेगाव येथे बोलावून घेतले अशी आपबिती सांगितली, पोलिसांनी घेतलेल्या झडतीत त्यांच्या कडून डीलक्स कंपनीचे ३ निरोध किंमत ९० रुपये, चार हजार सहाशे रुपये नगदी तसेच चार मोबाईल व बजाज पल्सर कंपनीची मोटारसायकल किंमत ५० हजार, डीलक्स कंपनीची मोटारसायकल किंमत ४० हजार असा एकूण १ लाख २३ हजार ६९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. उपरोक्त आरोपीं विरुद्ध कलम ४,५,६ अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ अनवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई स्थागुशा बुलढाणा यांच्या पथकाने केली असून वृत्तलिहेपर्यंत कारवाई सुरू होती. 



Post a Comment

أحدث أقدم