संजयजी बगाडे यांचा वाढदिवसा सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-सत्यशोधक सेवा समितीचे महाराष्ट्र सचिव तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार गटाचे कार्याध्यक्ष संजयजी बगाडे, यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने मोठ्या उत्साहाने साजरा झाला,संजयजी बगाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्यशोधक जनसेवा समिती चे, संजयजी बगाडे मित्रपरिवार तसेच माळी सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने सकाळी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ तसेच बिस्कीट वाटप करण्यात आले तर संध्याकाळी सहा वाजता माळी समाज भवन येथे सुप्रसिद्धअभ्यासू विचारवंत प्रबोधन करणारे वक्ते डॉ श्यामजी देवकर यांचे वऱ्हाडातील सत्यशोधक चळवळ या विषयावरती व्याख्यान पार पडले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की विदर्भात जात झाली होती चुकीच्या होत्या त्याच्या विरोधात वऱ्हाडात जी सत्यशोधक चळवळ करण्यात आली ही चळवळ कशी राबवण्यात आली व त्यास राबवणारी लोक कसे होते आपल्या बहुजन समाजाला चालीरीती देव धर्म या नावावर अंधश्रद्धा घालवण्याचे कार्य हे जे चालू होते ते किती भयंकर होते, असे सांगितले त्याप्रमाणे संजयजी बगाडे त्यांनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून जो उजाळा दिला, तो स्तुत्य असून चालू ठेवावा असे सांगितले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यशोधक सेवा समितीचे अध्यक्ष सुरेशजी वावगे हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर दादासाहेब कवीश्वर, बुलढाणा मतदारसंघाचे माजी आमदार विजयराज शिंदे, माजी पंचायत समिती सभापती डॉ. सदानंद धनोकार, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील, माळी सेवा मंडळाचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे खामगाव विधानसभा अध्यक्ष धोंडीरामजी खंडारे,खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर आप्पा भोसले, खामगाव कॉटन मार्केटचे उपसभापती संघपाल जाधव, साहित्यिक श्री डोंगरे सर, ज्येष्ठ नेते पांडुरंग जी राखुंडे, साहित्यिक श्री अरविंद शिंगाडे, माळी सेवा मंडळाचे सचिव प्रदीपजी सातव,शेख सलीम अजय तायडे, डॉ. गुरफान खान, गणेशराव कोल्हे,काँग्रेस किसान आघाडी जिल्हाध्यक्ष अतुलजी शिरसाट, माजी पंचायत समिती उपसभापती तथा काँग्रेस नेते अंबादास वानखडे, भारत खंडेराव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी मान्यवरांसह अनेकांनी संजू भाऊ बगाडे यांचे अभिष्टचिंतन केले आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. दादासाहेब कवीश्वर यांनी आपल्या भाषणात सांगितले की संजू भाऊ बगाडे सारखे समाजसेवक राजकारणात असणे हे लोक हिताचे आहे, त्यांनी ते कायम सातत्य ठेवून चालू ठेवावे,त्याचप्रमाणे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना सांगितले की भविष्यात संजयजी बगाडे हे योग्य दिशेने जात आहेत, त्याप्रमाणे त्यांचे स्वप्न पूर्ण होतील यात तिळमात्रहीं शंका नाही त्यांचे कार्य हे लोक हिताचे आहे,यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना संजू भाऊ बगाडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या पुढील राजकीय तसेच सामाजिक सेवाभावी कार्याचा वाटचालीस शुभेच्छा दिल्या
यावेळी आपले अभिष्टचिंतनाला उत्तर देताना संजयजी बगाडे यांनी काव्याच्या माध्यमातून सुरुवात केली, जरी ओलंडत जात आहे मि आयुष्याचे मध्यांतर ...आजही माझ्या भावांनो तुम्हाला नाही दिले अंतर ...बाप ज्योतिबा आई सावित्री च्या चालनार मार्गावर...वाढदिवस तर नाममात्र पण ठाम राहणार शब्दावर.....असा आपल्या चाहत्यांना विश्वास दिला,आपल्या सर्वांच्या प्रेमाने व सहकार्याने मी चांगले कार्य करीत आहे आपले सहकार्य व प्रेम मला जे मिळते ते माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असून भविष्यात आपले प्रेम असेच राहू द्या मी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे या कार्यक्रमाकरिता सत्यशोधक जनसेवा समितीच्या सदस्यांनी, संजयजी बगाडे मित्र परिवाराच्या सदस्यांनी तसेच माळी सेवा मंडळाच्या सदस्यांनी अथक प्रयत्न केले आलेल्या मान्यवरांचे जनसेवा समितीच्या माध्यमातून आभार व्यक्त करण्यात आले.


إرسال تعليق