लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती द्वारे वृक्षारोपण
खामगाव - जनोपचार न्यूज नेटवर्क : लॉयन्स क्लब खामगांव संस्कृती तर्फे स्थानिक जनुना तलाव रोडवरील पारले बिस्कीट फॅक्टरी समोरील रस्त्याच्या कडेला प्रांत व धरा की पुकार प्रकल्पाअंतर्गत ५१ वृक्षांची लागवड करण्यात आली. सदर वृक्षांचे संगोपनाची जबाबदारी एमजेएफ लॉ. अभय अग्रवाल यांनी घेतली. झाडांचे नुकसान होण्यापासून संरक्षण करण्यासाठी ट्री गार्ड आणि जाळ्याही लावण्यात आल्या. लॉयन्स संस्कृती तर्फे झाडे लावण्याचे तसेच त्यांची संपुर्ण काळजी घेण्याचे काम केलेजात आहे. यावेळी क्लबचे सदस्य व पदाधिकाऱ्यांकडून श्रमदान करण्यातआले. ६ ते १० फुटांची सर्व झाडे श्रीहरी लॉन्सचे संचालक दामोदर पांडे यांनीदिली. मोठी झाडे लावल्याने त्यांची वाढ झपाट्याने होते आणि त्यांची देखभाल कमी लागते असे प्रतिपादन कोषाध्यक्ष लॉ. गजानन सावकार यांनी केले. याकार्यक्रमाला लॉ. गजानन सावकार, लॉ. अजय एस. अग्रवाल, लॉ. पियुष टिबडेवाल,लॉ. हरीश अग्रवाल, लॉ.सौ. खुशबु अग्रवाल, एमजेएफ लॉ. अभय अग्रवाल, झेडसीएमजेएफ लॉ. उज्वल गोयनका, आरसी एमजेएफ लॉ. सुरज एम. अग्रवाल, शिवांगीबेकर्स चे संचालक रोटेरियन रितेश केडीया यांची उपस्थिती होती. उपरोक्त माहिती डिस्ट्रीक्ट कॅबीनेट ऑफीस एमजेएफ लॉ. राजकुमार गोयनका पीआरओ यांनी दिली आहे.

إرسال تعليق