मृतक कृष्णाच्या मारेकऱ्यांवर कठोर कार्यवाही करा..

 मराठा पाटील युवक समितीचे शेगाव तहसीलदार यांना निवेदन.....



शेगाव प्रतिनिधी :- 25 जुलै रोजी कृष्णा नामक 14 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती या हत्याकांडातील आरोपींना कठोर शिक्षा देऊन कार्यवाही करण्यात यावी याकरिता मराठा पाटील युवक समिती शेगावच्या वतीने 26 जुलै रोजी शेगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद आहे की, 23 जुलै रोजी कृष्णा राजेश्वर खराडे या 14 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना 25 जुलै रोजी उघडकीस आली होती. या घटनेनंतर सर्व समाजामध्ये एकच हळहळ व्यक्त करण्यात येत असून कृष्णाच्या मारेकऱ्यांवर फास्टट्रॅक वर हे प्रकरण लावून सदर मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी असे निवेदन मराठा पाटील युवक समितीच्या वतीने शेगाव तहसीलदार यांना देण्यात आले आहे. तसेच या हत्यामागचा नेमका हेतू काय होता या गोष्टीची सखोल चौकशीची मागणी यावेळी मराठा पाटील युवक समितीच्या वतीने करण्यात आली.

या निवेदनावर मराठा पाटील युवक समितीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या

Post a Comment

أحدث أقدم