'माझी लाडकी बहीण योजना जनजागृती' रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर: प्रथम वैष्णवी हिवाळे , द्वितीय प्रज्ञा टवलारे तर तृतीय साक्षी पारखे
![]() |
| प्रथम वैष्णवी हिवाळे |
![]() |
| द्वितीय प्रज्ञा टवलारे |
महिलांमध्ये कलात्मकता आणि सामाजिक जनजागृतीचा संदेश रुजवण्याच्या उद्देशाने आयोजित या स्पर्धेत खामगाव मतदारसंघातील तरुणी, महिला आणि कलाक्षेत्रात रुची असणाऱ्या अनेक स्पर्धकांनी भरभरून प्रतिसाद दिला. एकूणच, विविध वयोगटातील तरुणी, महिलांनी आपल्या रांगोळीतून 'माझी लाडकी बहिण' योजनेचा सुंदर आणि आशयपूर्ण संदेश रेखाटला. यामुळे महिला सशक्तीकरण आणि महिलांसाठी शासनाच्या कल्याणकारी योजनेबाबत लोकांपर्यंत माहिती पोचण्यासाठी उपयोग झाला.
सदर स्पर्धेमध्ये वैष्णवी गजानन हिवाळे यांनी रांगोळीतून 'माझी लाडकी बहिण' योजनेचा सखोल संदेश प्रभावीपणे साकारला. त्यांना रु. ५००१ चे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले. तर प्रज्ञा टवलारे यांनी काढलेल्या आशयघन आणि कलात्मक रांगोळीला रु. ३१०० चे द्वितीय बक्षीस तर साक्षी पारखे यांच्या उत्कृष्ट कलाकृतीला रु.१५०० चे बक्षीस तृतीय क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
![]() |
| शुभेच्छा जाहिरात फक्त 100 रुपयात |
'माझी लाडकी बहिण' योजनेचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी रांगोळीच्या माध्यमातून साकारलेल्या सुंदर कलाकृती साकारणाऱ्यांचे आमदार ॲड. आकाश फुंडकर यांनी अभिनंदन केले आहे.





Post a Comment