प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये श्रध्दांजली
खामगाव -जनोपचार न्यूज नेटवर्क :+ भारतीय उद्योग विश्वातील धूर्व तारा रतन टाटा यांच्या निधनाने अवघा देश हळहळला असून आवर येथील जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये आज 11 ऑक्टोंबर रोजी रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आज सकाळी शाळेत हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी उद्योग रत्न रतन टाटा यांच्या स्मृतींना अभिवादन केले. या भारतीय सुपुत्रामध्ये निखळ मानवता , खरे राष्ट्रप्रेम सामान्य व्यक्ती बाबत आदर, प्राण्यांसोबत वासल्य, उच्चकोटीची उद्योजकता, आधुनिक व्यवस्थापकीय तत्वाचा अंगीकार करून टाटा समुहात विश्वसनीय भारतीय जागतिक ब्रँड म्हणून प्रस्थापित केले. रतन टाटा कायम समाजाचा विचार करणारे ,माणुसकी जपणारे व आणि विनम्रतेचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या निधनाने प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये अमृततुल्य रत्न हरविल्याची भावना शाळेचे मुख्याध्यापक प्राध्यापक डी एस जाधव यांनी व्यक्त केली. असे विचार मंचावर व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी गुंजकर हबचे अध्यक्ष प्रा. रामकृष्ण गुंजकर सर , साचिव सौ. सुरेखाताई गुंजकर मॅडम यांनी रतन टाटा यांच्या निधनाच्या दुःखात सहभागी असल्याचे कळविले.


Post a Comment