Advt.



-------------------------------------------------------------------

महामहीम राज्यपाल श्री सी. पी. राधाकृष्णन बुलढाणा येथे जिल्ह्याच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी आले असता त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत राजकीय, क्रिडा, औद्द्योगिक,  सामाजिक सेवेकरी व पत्रकारिता मध्येअग्रगण्य क्रमाने काम करणाऱ्या जिल्ह्यातील 35 मान्यवरांसोबत चर्चा केली. त्यावेळी देवेंद्र दादा देशमुख यांनी जिल्ह्यात नवीन  उद्योग व परदेशीय गुंतवणूक येण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या यादीत  मागासलेला जिल्हा असल्याकारणाने  करामध्ये मोठ्या प्रमाणात सुट देण्यात यावी जेणे करून नवीन उद्योजक आकर्षित होतील व त्या अनुषंगाने रोजगार उपलब्ध होईल.

     तसेच जिगाव प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी ठोस अशी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. शासकीय अनुदानित शाळांमध्ये स्टेट बोर्ड अभ्यासक्रम शिकविल्या जात आहे. वर्ग 1 ली पासून ते 12 वी पर्यंत महारष्ट्र शासनाचा अभ्यासक्रम विद्यार्थांना शिकविल्या जातो व 12 वी नंतर पुढच्या शिक्षणाकरिता स्पर्धा परीक्षा होत आहे त्यासाठी जो अभ्यासक्रम आहे तो CBSE बेस आहे त्यामुळे गोरगरीब पालकांचे शासकीय व खाजगी अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे तरी शासकीय व अनुदानित शाळांमध्ये CBSE पॅटर्न चे शिक्षण देणे अनिवार्य करण्यात यावे 

   तसेच बुलढाणा जिल्हा हा दोन भागात विभागल्या  गेला आहे त्यामध्ये घाटावर 6 व घटाखली 7 तालुके येतात महारष्ट्र शासनाने जिल्हा मुख्यालयी बुलढाणा येथे वैद्यकीय महाविद्यालय मंजुरात दिले आहे परंतु घाटाखाली खामगाव येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी लागणारे Infrastructure खामगाव सार्वजनिक जिल्हा उप रुग्णालय यात उपलब्ध आहे  तसेच या लागत नगरपरिषदची मोठ्या प्रमाणात जमीन सुद्धा उपलब्ध आहे तरी खामगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय व्हावे या बाबत सकारात्मक निर्णय व्हावा अशी विनंती केली असता मा. महामहीम राज्यपाल यांनी त्या सर्व मागण्या रास्त असल्याची सांगत शासनास अशा प्रकारच्या सूचना देण्यात येतील असे प्रतिपादन केले यावेळी मा. ना. श्री. प्रतापरावजी जाधव, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक श्री विश्व पानसरे व जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार राजेशजी राजोरे, प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्यासह अधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.

Post a Comment

Previous Post Next Post