👉खामगावमध्ये २,३६५ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन संपन्न
👉आ. आकाश फुंडकर यांच्या पुढाकाराने खामगावच्या विकासाला नवी दिशा
👉कार्यसम्राट आमदार आकाश फुंडकर येत्या 5 वर्षात खामगांव मतदार संघाचा सर्वागिण विकास करणार – देवेंद्रजी फडणवीस
खामगाव रत्नाताई दिक्कर: खामगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या २,३६५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावून, स्वतःच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन केले. यावेळी भरगच्च़ सभेला संबेाधीत करतांना मा.उपमुख्यमंत्री देवेद्रजी फडणवीस म्हणाले की, “कार्यसम्राट आमदार ॲड आकाश फुंडकर येत्या 5वर्षात खामगांव मतदार संघाचा सर्वांगिण विकास करणार”
या कार्यक्रमाच्या माध्यमातून खामगाव मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासाच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि सिंचनाची सुविधा वाढवण्यासाठी जिगाव प्रकल्प हा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून खामगाव मतदारसंघाच्या १००% शेतीला सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
त्याचबरोबर, खामगाव मतदारसंघातील शेतकऱ्यांसाठी पांदन रस्त्यांच्या सोयीसाठी खास मागणी करत, यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार असल्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिले. मार्चच्या बजेटमध्ये या पांदन रस्त्यांचा समावेश केला जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या संपूर्ण विकासकामांच्या योजनेत आ. आकाश फुंडकर यांचे विशेष योगदान महत्त्वाचे ठरले आहे. खामगावच्या विकासाची दूरदृष्टी त्यांनी घेतलेली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली खामगाव मतदारसंघाने विकासाच्या दिशेने मोठी झेप घेतली आहे. त्यांनी मतदारसंघातील शेतकरी, युवक, आणि महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच २,३६५ कोटी रुपयांच्या या विकासकामांची यशस्वी अंमलबजावणी झाली आहे.
आ. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात पाणी, रस्ते, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधांचा विस्तार होत आहे. विशेषत: जिगाव प्रकल्पामुळे खामगावच्या शेतकऱ्यांची पाण्याची समस्या कायमची सुटणार आहे. त्यांनी सातत्याने या प्रकल्पासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे खामगाव मतदारसंघात सध्या सिंचनाखालील शेतीचे क्षेत्र लक्षणीय वाढणार आहे.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्या नागरिकांनी आ. आकाश फुंडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे खामगाव मतदारसंघात विकासाची गंगा येत आहे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
या भव्य सोहळ्याला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार डॉ. संजय कुटे, माजी आमदार चैनसुख संचेती, माजी आमदार विजयराज शिंदे, भाजपा सोशल मीडियाचे प्रदेश सह-संयोजक सागरदादा फुंडकर, खामगाव भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, मा. जिल्हा परिषद अध्यक्ष उमाताई तायडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
खामगाव शहरात भाऊसाहेब फुंडकर यांचे स्मारक उभारण्याची तसेच आयटीआय कॉलेजला त्यांचे नाव देण्याची मागणी यावेळी आमदार डॉ. संजय कुटे यांनी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत फडणवीस यांनी लवकरच या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले
खामगाव मतदारसंघातील जनतेने या कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिला. हजारो नागरिकांचा उत्साह, त्यांची प्रचंड उपस्थिती आणि रेकॉर्डब्रेक गर्दी यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. आजच्या विकासकामांच्या लोकार्पणामुळे खामगावच्या प्रगतीला नवी दिशा मिळणार आहे, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रत्येक स्तरावरील नागरिकांसाठी विकासात्मक प्रकल्पांना चालना देणाऱ्या आ. आकाश फुंडकर यांच्या प्रयत्नांनी खामगाव मतदारसंघाच्या विकासाची गती निश्चितच वाढणार आहे. यशस्वीपणे हा सोहळा पार पाडण्यासाठी कष्ट घेतलेल्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिकांचे आ. आकाश फुंडकर यांनी मनःपूर्वक आभार मानले.





إرسال تعليق