*बुलडाणा जयहिंद लोकचळवळीने राज्यात पटकावला दुसरा क्रमांक*

*पाचव्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये सन्मानचिन्ह देऊन गौरव*



 खामगाव : बुलढाणा जयहिंद लोकचळवळीच्या वतीने जिल्हा समन्वयक स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली खामगाव विभागात वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात आले. जयहिंद लोकचळवळीच्या उपक्रमांमध्ये बुलढाणा टीमचा राज्यात दुसरा क्रमांक आला आहे. जयहिंद लोकचळवळीच्या पाचव्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये बुलडाणा टीमला सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. जळगावच्या प्रसिद्ध 'गांधीतीर्थ' मध्ये ही तीन दिवसिय ग्लोबल कॉन्फरन्स विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली.


 माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आमदार सत्यजितदादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली जयहिंद लोकचळवळ राज्यभर सुदृढ समाज निर्मितीसाठी विविध कार्यक्रम घेत असते. राज्यात हजारो युवकांची फळी जयहिंद लोकचळवळीत सक्रिय आहे.


बुलढाणा जयहिंद लोकचळवळीच्या जिल्हा समन्वयकपदी स्वप्नील ठाकरे पाटील यांची गत वर्षी निवड झाली होती. त्यानंतर वर्षभर बुलढाणा जिल्ह्यात विशेष करून घाटाखालील खामगाव विभागात स्वप्निल ठाकरे पाटील यांच्या नेतृत्वात विविध विधायक उपक्रम राबविण्यात आले. त्यात शेतकऱ्यांना मोफत विमा अर्ज, विद्यार्थ्यांचे निशुल्क आरटीआय अर्ज, महिलादिनी कर्तुत्ववान महिलांचा पुरस्कार सोहळा आणि व्याख्यान , आरोग्य तपासणी शिबिर व उपचार, वृक्षारोपण, रक्तदान, रुग्णांना फळ वाटप, अन्नदान, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत, सोबतच जयहिंद लोकचळवळीच्या सर्व उपक्रमांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा सहभाग उल्लेखनीय राहिला. त्याची दखल घेत बुलढाणा टीमला राज्यातून दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. जयहिंद लोकचळवळीच्या पाचव्या ग्लोबल कॉन्फरन्स मध्ये 'गांधी तीर्थ' जळगाव येथे बुलढाणा टीमचा सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सन्मानाने आता आमची जबाबदारी वाढली असून आगामी काळात जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून विधायक उपक्रम राबवल्या जातील, अशी प्रतिक्रिया जिल्हा समन्वयक स्वप्निल ठाकरे पाटील यांनी दिली असून खामगाव विभागातील खामगाव, शेगाव, संग्रामपूर,नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद या तालुक्यातील युवकांनी जयहिंद चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन सुद्धा केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post