"त्या" फलका प्रकरणी माजी आमदार दिलीप सानंदा सह मनोज गुळवे विरुद्ध गुन्हा दाखल

खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- स्थानिक नगर परिषदेसमोर लावण्यात आलेल्या "त्या" फलक प्रकरणी माजी आमदार दिलीप सानंदा व मनोज गुळवे विरुद्ध पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.सरतर्फे पो.हे.कॉ. नितीन शांताराम पाटील, वय 51 वर्षे, ब.नं. 1263 पो.स्टे. खामगांव शहर यांच्या तक्रारीवरून सदाचा गुन्हा दाखल करण्यात आला

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नमुद घ. ता. वेळी व ठीकाणी यातील आरोपीतांनी संगणमत करुन नगर परीषद टर्निंग येथे एक बॅनर लावले असुन बॅनरवर "Laapataa LaDies 1 वर्षात64,000 महिला बेपत्ता..." असे लिहून त्याखाली पिच्चर चे पोस्टर व त्या खाली उपमुख्यमंत्री वमुख्यमंत्री, गृहमंत्री यांचे सारखे दिसनारे अर्धवट फोटो लावलेले आहे. सदर माहिती आम्ही मा.पो.नि सा यांना देवुन त्यांचेसह आम्ही व सोबत पोहेकॉ विनोद राठोड बनं 853, पोना दिनेशसिंग इंगळे बनं 1967असे सदर ठिकाणी जावुन पोस्टर ची पाहणी केली असता त्यावर "Laapataa LaDies 1 वर्षात64,000 महिला बेपत्ता..." असे लिहुन त्याखाली पिच्चर चे पोस्टर व त्या खाली उपमुख्यमंत्री वमुख्यमंत्री,गृहमंत्री यांचे सारखे दिसनारे अर्धवट फोटो लावलेले आहे. तिन व्यक्तींचे अर्धवट चेहरे असलेलेफोटो ज्यामध्ये एका व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्या सारखा गणवेश घातलेला असुन हातात कोरे कार्ड आहे.त्याचे फोटो खाली श्री. एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री नाव असे आक्षेपार्ह पोस्टर दिसुन आले. बॅनरकंत्राटदार मनोज शांताराम गुळवे वय 35 वर्ष रा. आठवडी बाजार खामगांव यांना यापुर्वी आक्षेपार्ह बॅनरतयार करुन लावु नये याबाबत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 कलम 168 प्रमाणे नोटीस देण्यात आलेली असून सुद्धा त्यांनी जाणीवपूर्वक मा.ना. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांचे आक्षेपार्ह बॅनर लावून चित्र विचित्र कृती करून चारित्र्य म्हणून केले आहे व मा जिल्हाधिकारी बुलढाणा यांचा क्रमांक गृह विभाग कक्ष 4-2/कावी/334/2024 दिनांक 23 /9/ 24 मुंबई पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1),37(3) प्रमाणे आदेशाचे उल्लंघन केले आहे तसेच लोकसेवकाने ठरवून दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही अशा आशयाच्या तोंडी रिपोर्टवरून सदरचा अप दाखल करून अधिक तपास मा पोनिसा हे करत आहे

Post a Comment

أحدث أقدم