"विठ्ठल नामाची शाळा भरली....!"
विठ्ठल लोखंड यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
मुंबई :- काँग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्यांची संख्या दररोज वाढत असून सोमवारी टिळक भवनमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार व बुलढाणा जिल्ह्याचे माजी अध्यक्ष धृपदराव सावळे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, नांदेड जिल्ह्यातील मुखेड देगलूर मतदार संघाचे भाजपाचे माजी आमदार अविनाश घाटे, राज्य ग्राहक सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे कमाल फारुखी, प्रवक्ते उमर फारुखी, अकोला जिल्ह्यातील वंचितचे डॉ. रहेमान खान, बाळापूरचे माजी नगराध्यक्ष जम्मूसेठ यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नाना पटोले यांनी सर्वांचे काँग्रेस कुटुंबात स्वागत करुन शुभेच्छा दिल्या.

Post a Comment