कॅबिनेट मंत्री आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला आणि घेतली अधिकाऱ्यांची आढावा बैठक

खामगाव-महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळातील महत्वपूर्ण खात्यांपैकी एक असलेल्या कामगार खात्याची जबाबदारी खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. इतक्या मोठ्या व महत्वपूर्ण असठेल्या मंत्रीपदाच्या जबाबदारीने ना. आकाशदादा फुंडकर राजकीय नेतृत्वाचा परीघ वाढला असून या संधीचे सोने करुन राज्यमंत्री मंडळात उत्कृष्ठ कामाथी छाप सोडण्याचा निर्धार ना. आकाशदादा फुंडकर यांनी केला आहे. दरम्यान आज त्यांनी मुंबई मंत्रालय येथे कामगार मंत्री म्हणून पदभार घेतला आणि लगेच अधिकारी वर्गाची आढावा बैठक घेतली.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत खामगाव विधानसभा मतदारसंघातून २५ हजाराहून अधिक मताधिक्क्याने सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले युवा आमदार अॅड. आकाशदादा फुंडकर यांच्या मळ्यात पक्षाने अत्तपेक्षितपणे कॅबीनेट मंत्रीपदाची माळ घातली. पहिल्यांदाच मंत्री झालेले ना. आकाश पुंडकर यांच्याकडे कामगार खात्यासारखे अतिशय महत्वाच्या मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कामगार मंत्री ही खूप मोठी जबाबदारी आणि कार्यकरण्याची संधी आहे. काममार मंत्रीपदाच्या कार्यक्षेत्रात अत्यंत महत्वाची कामे येतात. महाराष्ट्रातील कामगार मंत्री है राज्यातील कामगार वर्गाशी संबंधीत धोरण तयार करणे, त्याची अंमलबजावणी करणे आणि कामगारांच्या हक्कांचे संरक्षण सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतात. राज्यभरात मोठ्या संख्येने असणा-या कामगारांशी संबंधीत असणारे कामगार मंत्रालय आणि त्याचे मंत्री यांना खूप महत्व असून या पदाला न्याय मिळवून देण्यासाठी युवा नेतृत्व ना. आकाशदादा फुंडकर है पूर्णतः सदाम आहेत.कामगार खात्याचा इतिहास पाहता आता पर्यंत अनेक दिग्गज नेत्यांनी या खात्याची जबाबदारी सांभाळलेली आहे

إرسال تعليق