महामानवा चरणी आंबेडकरी अनुयायांची मान वंदना
खामगाव - डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमच्या पुढाकारातून महापरीनिर्वाण दिनानिमित्त महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मान वंदना देण्यात आली. सकाळी 6 वाजता आंबेडकरी अनुयायांच्या वतीने हे अभिवादन केले गेले. सर्व प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून बुद्ध वंदना घेण्यात आली. महापुरुषंचे जयघोषाने परिसर दनाणला.
![]() |
| जाहिरात |
यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमचे विदर्भ अध्यक्ष तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अ. जा.गौतम गवई, विभागीय संघटक अंबादास वानखडे माजी उपसभापती, पंजाबराव देशमुख जेष्ठ नेते, अजय तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग, गजानन दामोदर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,ऍड अशोकराव इंगळे, किरण मोरे संपादक ,ऍड अविनाश इंगळे, अतुल सिरसाट , ऍड. बाळासाहेब मुळे,गबाजी मुळे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, खिराडे साहेब, विजय बोदडे जिल्हाध्यक्ष रिपाई (गवई ), राजू खंडारे,अमोल गव्हाणदे सरपंच पती जणूना, अश्फाक भाई, नंदू भाऊ भारसाकळे , भारत गवई, अशफाक भाई,विशाल सावदेकर इत्यादी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.



Post a Comment