बेपत्ता युवकाचा जनुना तलावात मृतदेह आढळला
![]() |
| संग्रहित छायाचित्र |
खामगाव - स्थानिक रावण टेकडी भागातून बेपत्ता झालेल्या युवकाचा आज दुपारी जनुना तलावात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
रावण टेकडी भागातील रहिवाशी रमेश भिकाजी उईके (२८) हा ३१ डिसेंबर रोजी कामावर जातो असे सांगून घरून निघून गेला होता. मात्र तो परत आला नाही. यामुळे याबाबत त्याच्या भावाने शिवाजी नगर पोलीस स्टेशनला हरविल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान आज दुपारी जनुना तलावात रमेश भिकाजी उईके याचा मृतदेह आढळून आला आहे. वृतलीहे पर्यंत या प्रकरणी पोलिसांची पुढील कार्यवाही सुरू होती.

إرسال تعليق