खामगावकरांच्या उदंड प्रतिसादात लॉयन्स एक्सपो 2025 चा समारोप
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क नितेश मानकर
लायन्स क्लब सर्विस ट्रस्ट अंतर्गत लायन्स क्लब खामगाव च्या वतीने व शगुन इव्हेंट्स नागपूर यांच्या सहकार्याने लॉयन्स एक्सपो 2025 चे यशस्वी आयोजन दिनांक 6 मार्च ते 11 मार्च दरम्यान स्थानिक पॉलिटेक्निक ग्राउंड जलंब रोड वर करण्यात आले. लॉयन्स क्लब खामगाव च्या वतीने दरवर्षी भव्य व्यापार कृषी व्यंजन व मनोरंजन प्रदर्शनी लॉयन्स एक्सपो चे आयोजन करण्यात येते या यशस्वी आयोजनाचे हे 12 वे वर्ष होते .
लॉयन्स एक्सपो 2025 चा समारोप समारंभ मंगळवार दिनांक 11 मार्च रोजी सायंकाळी करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मल्टिपल कौन्सिल चेअर पर्सन लॉयन सुनील देसरडा होते त्यांच्यासोबत विशेष अतिथी म्हणून द्वितीय प्रांतपाल राहुल औसेकर, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अशोक भाऊ सोनोने ,पूर्व प्रांतपाल डॉ अशोक बावस्कर, जी ए टी कोऑर्डिनेटर डॉ प्रदीप गर्गे, माजी नगराध्यक्ष सौ अलकाताई सानंदा, महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल भाऊ नावंदर,रिजन चेअर पर्सन किशोर गरड, झोन चेअर पर्सन तेजस झांबड, शगुन इव्हेंट्स चे श्री गोविंद राठी उपस्थित होते लायन्स क्लब खामगाव चे अध्यक्ष शंकर परदेशी ,एक्स्पो चेअर पर्सन धर्मेश शहा ,क्लब सचिव डॉ धनंजय तळवणकर ,एक्स्पो सचिव नंदकुमार देशमुख, क्लब कोषाध्यक्ष राहुल भट्टड, एक्सपो कोषाध्यक्ष ल्यूकेश मुदलियार ,लिओ गौरव खत्री यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती
राहुल भट्टड यांनी केलेल्या ध्वजवंदने ने कार्यक्रमाची सुरुवात झाली . अध्यक्ष लॉ शंकर परदेशी यांनी आपल्या स्वागत पर भाषणात एक्स्पोचा आढावा घेतला. यावेळी लॉ किशोर गरड , लॉ डॉ प्रदीप गर्गे, लॉ अनिल भाऊ नवंदर , अशोक भाऊ सोनवणे , लॉ राहुल औसेकर, लॉ डॉ अशोक बावस्कर आणि सुनील देसरडा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना लॉयन्स एक्सपो चे भरभरून कौतुक केले. लॉयन्स एक्सपो चे सुंदर आयोजन आणि या आयोजनातून उभा होणारा निधी हा लायन्स आय हॉस्पिटल खामगाव द्वारे गरीब व गरजू रुग्णांच्या नेत्र शस्त्रक्रिया या उदात्त हेतूसाठी साठी वापरला जाणार असून या कामात या एक्सपोला भेट देणाऱ्या प्रत्येक खामगावकरांनी आपला खारीचा वाटा उचलला आहे. यावर्षी लॉयन्स एक्सपोला खामगाव चे उपविभागीय अधिकारी रामेश्वर पुरी , तहसीलदार,ठाणेदार साहेब , शासकीय तंत्रनिकेतन चे श्री प्रभुणे सर , देशोन्नती बुलढाणा आवृत्तीचे संपादक श्री राजेश राजोरे तसेच विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी व पत्रकारांनी भेट देऊन आयोजनाबद्दल गौरवोद्गार काढले.
लॉयन्स एक्सपो 2025 दरम्यान घेतल्या गेलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना या कार्यक्रमात पारितोषिके देऊन गौरविण्यात आले तसेच विविध चार चाकी आणि दुचाकी गाड्यांचे यावेळी पाहुण्यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे लॉ सुनील देसरडा यांनी लायन्स एक्सपो 2025 च्या यशस्वीतेसाठी मेहनत घेणाऱ्या लायन्स एक्सपो टीमला प्रातिनिधिक स्वरूपात पिन व प्रमाणपत्र देऊन गौरव केला . यावेळी लायन्स क्लब खामगाव च्या वतीने पुढील वर्षी होणाऱ्या लायन्स एक्सपोची तारीखही जाहीर करण्यात आली दि 22 ते 27 जानेवारी 2026 दरम्यान लायन्स एक्सपो 2026 चे आयोजन करण्यात येईल .लॉयन्स एक्स्पो 2025 ला खामगावकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आयोजकांतर्फे खामगावकरांचे मनस्वी आभार मानण्यात आले.
समारोप समारंभाचे संचालन लॉ डॉ परमेश्वर चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन सचिव धनंजय तळवणकर यांनी केले अशी माहिती लॉ डॉ परमेश्वर चव्हाण यांनी दिली आहे.




Post a Comment