मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनी सन्मान नारीशक्तीचा कार्यक्रमचे आयोजन, पत्रकारांच्या आई आणि पत्नींचा होणार सन्मान 

खामगाव -जनोपचार न्यूज नेटवर्क  :- मराठी पत्रकार परिषद मुंबई सवलग्नित असलेल्या खामगाव मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने येत्या 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून खामगाव शहरातील पत्रकारांच्या सन्माननीय मातांचा व सुविद्य पत्नीचा या ठिकाणी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. 




 सदर कार्यक्रम केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आकाशदादा फुंडकर  उपस्थित राहणार आहे. जागतिक महिलादिनी सत्कार मूर्ती म्हणून दिवंगत कृषी मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या पत्नी तथा समाजसेविका श्रीमती सुनिताताई पांडुरंग फुंडकर यांचा सत्कार होणार आहे. याचबरोबर सदर कार्यक्रमाला विशेष आमंत्रित म्हणून सौ. गौरी अशोक थोरात सिने अभिनेत्री आई तुळजाभवानी कलर्स टीव्ही, सौ. वंदना कारखेले उपविभागीय पोलीस अधिकारी बुलढाणा, कु. सोनाली भाजी भाकरे निवासी नायब तहसीलदार खामगाव, सौ कोमल सचिन तायडे महिला उद्योजिका तथा जनक्रांती फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, मृणाल सावळे महिला जिल्हाध्यक्ष महिला सेल मराठी पत्रकार परिषद आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सदर कार्यक्रमांमध्ये खामगाव शहरातील सर्व पत्रकारांच्या आई आणि सुविद्य पत्नींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि पैठणी साडी देऊन सन्मान करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन येथील पत्रकार भवन येथे 8 मार्च रोजी रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आलेले असून कार्यक्रमाच्या नंतर सर्वांना भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. तरी या कार्यक्रमाला शहरातील सर्व पत्रकार बांधवांनी तसेच पत्रकारांच्या आई आणि पत्नींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, जिल्हा कार्यकारणी सदस्य सतीशआप्पा दुडे, जिल्हा सहसमन्वयक अनुप गवळी, तालुका अध्यक्ष महेश देशमुख, शहर अध्यक्ष गणेश पानझडे, कार्याध्यक्ष डिजिटल मीडिया परिषदचे कुणाल देशपांडे तसेच समस्त मराठी पत्रकार परिषद खामगाव तालुका व शहर संघातर्फे करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post