जागतिक महिला दिनानिमित्त समुपदेशन व कायदेविषयक मार्गदर्शन
आईच आपल्या मुलीला योग्य समुपदेशन करू शकते - प्रीती मगर
खामगाव (सौ वनिता मानकर) : आजच्या युगात प्रत्येक आईने आपल्या मुलीं सोबत मैत्री चे नाते जपणे आवश्यक आहे.आईच आपल्या मुलीला योग्य समुपदेशन करू शकते असे मौलिक मार्गदर्शन समुपदेशक प्रीती मगर यांनी आज माजी नगरसेविका भाग्यश्री मानकर यांचे निवासस्थानी आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रमात केले त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर अनिताताई देशपांडे, जान्हवी ताई कुलकर्णी, माजी नगरसेविका भाग्यश्री ताई मानकर, सविताताई मानकर आदींची उपस्थिती होती. महिलांना सक्षम बनवण्यासाठी शासनाकडून अनेक उपक्रम राबविल्या जातात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांना समुपदेशक व कायदेविषयक माहिती व्हावी या उदात्तेतून आज भाजप महिला मोर्चाच्या वतीने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अनिताताई देशपांडे यांनी मुलींना हिम्मत द्या स्वसंरक्षणाचे क्लासेस लावा. मुलींचा मोबाईल तपासून पहा असे मौलिक मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान जान्हवी ताई कुलकर्णी यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाला आलेल्या महिलांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रत्नाताई डिक्कर तर संचालन व आभार प्रदर्शन भाग्यश्री ते मानकर यांनी केले











Post a Comment