सानंदांबद्दलच्या विविध चर्चांना "फुलस्टॉप"!.
मी कुठेही जाणार नाही काँग्रेसमध्येच ठाम -दिलीप कुमार सानंदा

हीच ती सोशल मीडियावर व्हायरल होत असलेली पोस्ट
राजकीय पक्षांमध्ये विविध घडामोडी समोर येत असताना खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा हे पक्ष सोडणार असल्या ची पोस्ट सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. या पोस्टमुळे अनेकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्यामुळे जनोपचार ने थेट दिलीप कुमार सानंदा यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधले असता त्यांनी सदर पोस्ट एक अफवा असल्याचे स्पष्ट करून देत मी काँग्रेसमध्येच ठाम असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टवर पूर्णविराम लागला आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

إرسال تعليق