वन एशिया कंपनी तर्फे महिला दिवस उत्साहात साजरा
डॉ. शारदा अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती
खामगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क: वन एशिया नेटवर्क इंडिया प्रा. लिमिटेड यांच्या वतीने शनिवार, दि. 08 मार्च, 2025 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. शारदा नितीश अग्रवाल (स्त्रीरोग विशेषज्ञ - MS OBGY) या उपस्थित होत्या. त्यांनी महिलांच्या आरोग्याची महत्त्वाची भूमिका, वैयक्तिक स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. मिलिंद वैद्य (फॅक्टरी मॅनेजर), श्री. भाऊसाहेब शेळके (जनरल मॅनेजर), श्री. अतुल सकळकळे (Safety मॅनेजर), श्री. बाळासाहेब मुखेकर आणि इतर व्यवस्थापक वर्ग उपस्थित होते.महिला दिन कार्यक्रमानिमित्त केक कटिंग, वैयक्तिक स्वच्छता व महिला सशक्तीकरण यासंदर्भातील चर्चासत्र तसेच सिंधूताई सपकाळ यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित व्हिडिओ प्रदर्शन करण्यात आले. याशिवाय मॅनेजर वर्ग आणि कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांनीही प्रेरणादायी अनुभव आणि विचार मांडले.
खासकरून "जिथे स्त्रीला सन्मान आहे, तिथे समाज समृद्ध आहे" असे वक्तव्य यावेळी करण्यात आले.या कार्यक्रमास सिक्युरिटी कडून निशा देशमुख व इतरकंत्राटी महिला कर्मचाऱ्यांची विशेष उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम आनंदी आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.वन एशिया नेटवर्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड तर्फे महिला सशक्तीकरण आणि आरोग्य यासाठी अशाच उपक्रमांचे आयोजन पुढील काळातही करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

إرسال تعليق