अंबाजोगाई वकील संघाच्या अध्यक्षपदी एडवोकेट अजित लोमटे तर सचिव पदी एडवोकेट रविकांत सापते
अंबाजोगाई( प्रतिनिधी) अंबाजोगाई वकील संघाच्या अध्यक्ष पदी अँड. अजित राजेसाहेब लोमटे यांची तर सचिव पदी अॅड रविकांत सापते यांची निवड झाली असून या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रती वर्षा प्रमाणे याही वर्षी सण २०२५-२६ साला साठी अंबाजोगाई वकील संघाची निवडणूक अत्यंत खेळी मेळीच्या स्वरूपात पार पहली या निवडणुकीत अजित लोमटे व अँड काळम यांच्या नेतृत्वा खाली स्वतंत्र पॅनल उभा होते. या निवडणुकी मध्ये अध्यक्ष पदासाठी अॅड. अजित राजेसाहेब लोमटे यांची निवड करण्यात आली असून त्यांना २६२ मते तर प्रतिस्पर्धी अॅड. सतिष दामोधरराव काळम यांना ८९ मते पडली. उपाध्यक्ष पदा साठी अँड काळम गटाचे अॅड. दिलीप रखमाजी गोरे हे विजयी झाले असून यांना १६३ मते तर प्रतिस्पधीं अॅड. महादेव ज्ञानोबा मुदगलकर ७० तर अॅड. भागवत गंगाधर केंद्रे यांना १२० मते पदासाठी अॅड. पंकज दिलीपराव खांडेकर यांना १५१ तर प्रतिस्पर्धी अंडरविकांत शिवाजी सतीशांना १९९ मते पडली. सहसचिवपदा साठी अॅड. बालाजी बाबासाहेब किंर्दत वांना १६१ तर प्रतिस्पर्धी अॅड. बळीराम अंगद पुरी यांना १९१ मते पडली. ग्रंथपाल पदासाठी अॅड. छाया शेषेराव देहरे यांना १४१ तर प्रतिस्पर्धी अॅड. सय्यद शोयब अफसर यांना २११ मते पडली. अॅड.आर.आर नर्मळे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून काम पहिले तर त्यांना सिद्धेश्वर स्वामी यांनी सहकार्य केले.
सर्व नवनिर्वाचित पदाधिकान्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Post a Comment