भाजपा ने दिल्लीची सत्ता हाती घेतल्यानंतर काही भाजपाच्या नेत्यांनी वंदनीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच वंदनीय शहीद भगतसिंग या महापुरुषांच्या प्रतिमा काढून टाकल्या व वंदनीय राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच मा राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुरमुन तसेच मा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमा लावल्या आहेत यांच्या प्रतिमा लावल्या याचा विरोध कुणालाही नाही पण थोडा मनापासून विचार करायला हवा होता की देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे हसत हसत फासावर जाणारे शहीद भगतसिंग तसेच देशाच्या प्रगती उन्नतीसाठी खऱ्या अर्थाने मानवतेसाठी आपले आयुष्य समर्पित करणारे तसेच देशाच्या घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा काढून टाकल्या हे उचित नाही कारण फक्त एवढेच कि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा ह्या मागे आपची सरकार आली असता मुख्यमंत्री अरविंद जी केजरीवाल यांनी लावल्या होत्या म्हणून फक्त एवढेच कारण पण प्रतिमा काढून नेमके काय साध्य केले आहे काय माहित मी विचारात पडलो आहे की भाजप हा तोच पक्ष आहे का त्याचे नेतृत्व विचारवंत अटल बिहारी वाजपेयी यांचे होते प्रमोद जी महाजन मुरली मनोहर जोशी सुषमा स्वराज जसे नेते या पक्षाचे होते जे थोर महापुरुषांच्या सन्मान करणारे होते असो पण भाजपाच्या काही नेत्यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा काढल्या हे योग्य झाले नाही
संभाजीराव अशोकराव टाले
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा संघटक

Post a Comment