सक्षमीकरण आणि आजची प्रासंगिकता" या विषयावर व्याख्यान
स्त्रियांनी परिवर्तनाच्या चळवळीमध्ये अग्रेसर राहावे- ॲड. कल्याणी विर्धे
अंबाजोगाई जनोपचार न्यूज नेटवर्क: जागतिक महिला दिनानिमित्त श्री संत गजानन अध्यापक महाविद्यालयामध्ये "स्त्री सक्षमीकरण आणि आजची प्रासंगिकता" या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र. प्राचार्य डॉ. विवेक घोबाळे तर प्रमुख व्याख्याते विधीतज्ञ ॲड.कल्याणी विर्धे या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रमुख व्याख्याते ॲड.कल्याणी विर्धे यांचा शॉल, पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी छात्राध्यापकांनी स्वागत गीत व प्रेरणादायी भाषणे केली. कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ॲड.कल्याणी विर्धे या छात्रअध्यापक विद्यार्थ्यांशी संबोधन करताना म्हणाल्या की, महिलांचे संरक्षण, अधिकार व स्वातंत्र्य हे भारतीय संविधानाच्या कलम 14 अन्वये कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण सुनिश्चित करते. कलम 15 नुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थानावर आधारित राज्याकडून भेदभाव करण्यास मनाई आहे. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांसाठी विशेष तरतुदींना परवानगी देते. अनुच्छेद 19 नुसार भारतातील प्रत्येक व्यक्तीला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे. तसंच भारताच्या कोणत्याही भागात संचार करण्याचं स्वातंत्र्य, कोणत्याही भागात वास्तव्याचं स्वातंत्र्य, कोणताही व्यवसाय करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे. अनुच्छेद 21 नुसार प्रत्येक व्यक्तीस जिवीत संरक्षण आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे
. तसेच त्यापुढे बोलताना म्हणाल्या महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार विरोधात विविध प्रतिबंधात्मक कायद्याची तरतूद करण्यात आली आहे. हुंडा बंदी कायदा:1961, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा: 2005, बालविवाह प्रतिबंध कायदा: 2006, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध आणि निवारण) कायदा: 2013 अशाप्रकारे महिलांच्या हक्कासाठी विविध कायद्याबाबत माहिती दिली. तसेच भारतीय राज्यघटनेत महिलांसाठी संवैधानिक अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे स्त्रियांनी पहिल्यांदा स्वतःचा सन्मान स्वतः करण्यास शिकले पाहिजे. आणि स्वतःला सामाजिक परिवर्तनवादी चळवळीमध्ये अग्रेसर राहून स्त्रियांच्या हक्क, अधिकार यासाठी लढाई लढली पाहिजे. हि लढाई केवळ स्त्रियांचीच नव्हेतर पुरुषांची देखील लढायला हवी. महिलांनी कधीच स्वतःला कमी लेखू नये. कारण महिला पूर्वीही, आजही आणि वर्तमानात देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहे. एखाद्या अधिकाऱ्याप्रमाणे स्त्री देखील 24 तास आपले घर, संसार आणि सामाजिक जबाबदारी पार पाडत असते. आजची परिस्थिती पाहिली तर महिलांसाठी विविध कायदे असून देखील महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना वृत्तपत्रात व बातम्या मध्ये दिसत आहेत. याला जबाबदार कोण?, महिलांच्या अस्तित्वाचा प्रश्न?, स्त्रियांच्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक उन्नतीचा व सलोख्याचा प्रश्न? महिलांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न? महिलांच्या विचारधारेचा प्रश्न? असे असंख्य प्रश्न उपस्थित केले. पुढे बोलताना म्हणाल्या की, या आधुनिक जगात स्त्रियांची कामगिरी उल्लेखनीय आहे. यापुढेही महिलांनी आपापल्या क्षेत्रात काम करत असताना आपला स्वाभिमान, आत्मसन्मान बाळगायला हवा. कारण सद्य परिस्थिती पाहता महिलांना वासनेतून पाहण्याच्या विकृत पुरुषीमानसिकतेचे समूळ नायनाट करण्यासाठी स्त्री-पुरुषांना एकमेकांसोबत मिळूनच कार्य करावे लागणार आहे. असे प्रतिपादन करत केले. आणि छात्रअध्यापकांशी मुक्तपणे संवाद साधला व जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या! कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक घोबाळे हे बोलताना म्हणाले, स्त्रियांची कामगिरी पूर्वी पेक्षा उल्लेखनीय आहे. आजचे युग तंत्रज्ञानाचे युग म्हटलं जातं आणि या तंत्रज्ञानाच्या जगात मुलींना शिकण्यासाठी मोठ्या प्रमाणात सोई-सुविधा उपलब्ध असून देखील महिला स्व प्रेरणेने पुढे येऊन आपल्या कारकिर्दीचा ठसा उमटवावा. तसेच त्यांनी अमेरिकेतील सुसान अँथोनी यांचा 1851 चा मताधिकाराचासाठीचा लढा असो की, न्यायमूर्ती शिरीन इबादी (इराण) यांचा मुस्लिम महिलांना न्यायाधीश व वकील म्हणून व्यवसाय करण्याच असो लढा अशा अनेक क्रांतिकारी स्त्रियांनी या गुलामगिरीच्या जोखड दंडातून बाहेर येण्यासाठी प्रचंड बौद्धिक ताकदीनिशी एकाधिकारशाही, विकृत पुरुषी मानसिकता इत्यादींच्या विरोधात परिवर्तनाचे रणशिंग फुंकले होते. त्यांच्या त्यागमय, प्रेरणादायी अशा ऐतिहासिक कार्यास व स्मृतींना उजाळा देत छात्रअध्यापकांना मार्गदर्शन केले व सर्व छात्र अध्यापकांना जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा दिल्या.
तसेच या कार्यक्रमाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन पर गुलाब पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्रा. अनिल बांगर सर, ग्रंथपाल श्री सचिन गायकवाड कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत गीत छात्रअध्यापक नक्षत्रा रणदिवे व नमिता झिरमिरे यांनी केले. श्रद्धा अंभोरे, हनुमंत शिंदे, विद्या फपाळ, आरती दळवे इत्यादींनी भाषणे केली. तर आभार धनंजय सोळुंके यांनी केले. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि छात्रअध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



إرسال تعليق