७.५ कोटी रुपये खर्चाच्या चार पुलांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न

इतिहासात कधी नव्हे एवढा निधी देवेंद्रजीमुळे खामगांव मतदार संघाला मिळाला – ना.फुंडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान जवळील, पोलीस स्टेशन जवळील, फरशी, व महाकाल चौक जवळील पुल शहरातील 4 महत्वाच्या पुलांचे होणार नुतणीकरण


खामगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत मूलभूत सुधारणा घडवून आणणाऱ्या ७.५ कोटी रुपयांच्या चार नव्या पुलांच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शनिवार, दिनांक १७ मे रोजी सकाळी ११ वाजता  शहर पोस्टे जवळील पुलाचे ना ॲड आकाश फुंडकर कामगार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते भुमिपूजन करुन सुरुवात करण्यात आली.

जाहिरात


यानंतर शहरातील सर्वात रहदारीचा भाग समजल्या जाणाऱ्या फरशी पुलाचे, डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर परिषद मैदान जवळील पुलाचे, व त्यानंतर महाकाल चौक रायगड कॉलनी जोडणाऱ्या पुलाचे भुमिपूजन मोठया थाटात संपन्न झाले. हा भूमिपूजन सोहळा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ॲड. आकाशदादा फुंडकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी प्रत्येक पुलाचे भूमिपूजन त्या परिसरातील जेष्ठ नागरीकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री संजय शिनगारे, राम मिश्रा शहराध्यक्ष राजेंद्र धनोकार, दिलीप पाटील, सतीषआप्पा दुडे, महेंद्र रोहणकार, ओम खंडेलवाल, चंद्रशेखर पुरोहित, राकेश राणा, जितेंद्र पुरोहित, पवन गरड, नगेंद्र रोहणकार,  रवि गायगोळ पाटील, जान्हवी कुळकर्णी, रेखा नेमाने, शिवानी कुळकर्णी,भाग्यश्री मानकर , श्रद्धा धोरण, अभिजीत एदलाबादकर, गोलू आळशी, यांचेसह परिसरातील नागरीक व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ना. आकाशदादा फुंडकर यांचे विशेष प्रयत्नातून या चार पुलांच्या कामासाठी रु.७.५० कोटी निधी मंजूर केला असन खामगाव शहरातील रहदारीसाठी ही चारही पुल अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत. नवीन बांधण्यात येणाऱ्या पुल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानाजवळील पुल बांधकाम खर्च : ₹99.66 लक्ष, शहर पोलीस स्टेशन ते अग्रसेन चौक रस्त्यावरील पुल बांधकाम खर्च : ₹154.51 लक्ष,  वीर सावरकर उद्यान ते महाकाल चौक रस्त्यावरील पुल, बांधकाम खर्च : ₹234.39 लक्ष, मेनरोडवरील फरशी पूल बांधकाम खर्च : ₹256.21 लक्ष या महत्त्वपूर्ण पुलांच्या बांधकामामुळे खामगाव शहरातील नागरिकांना सुरक्षित, सुलभ आणि जलद वाहतुकीचा लाभ होणार असून, शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर पडणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم