पैशाचा वाद......
शहापूर येथील दोघांवर खुनाचा गुन्हा
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: पैशाच्या कारणावरून मारहीणीत इसमाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची घटना १ मे रोजी शहापूर येथे घडली याबाबत दोंघाविरूध्द खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
![]() |
| जाहिरात फक्त शंभर रुपये |
शहापुर तालुका खामगाव येथील अजाबराब जामाजी सिरसाट वय ५० यांच्यासोबत गावातीलच अनिल प्रल्हाद रामचवरे व संजय उत्तम रामचवरे यांनी संगनमत करून पैशाच्या उसनवाणीवरून ३० एप्रिल रोजी वाद केला या वादातुन अजाबराव सिरसाट यांना जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. यामध्ये अजाबराव शिरसाट गंभीर जखमी झाले त्यांना खामगाव येथील शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले उपचार सुरू असताना त्यांचा एक मे रोजी मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी आरोपी अनिल व संजय यांच्या विरुद्ध कोणाचा गुन्हा दाखल केला.


Post a Comment