जेसीआय खामगांव सिटी तर्फे मातृऋण फेडण्याचा प्रयत्न
खामगांव - जेसीआय खामगांव सिटी तर्फे फुल ना फुलाची पाकळी म्हणून दि. 11 मे 2025 रोजी मातृदिना निमित्त एक शाम माँ के आंगन मे या प्रकल्पा अंतर्गत स्थानिक मातोश्री वृध्दाश्रम, जळगांव खांदेश येथे त्यांना एक दिवसाचे जेवण व मिठाईचे वाटप करण्यात आले. यावेळी सदर प्रकल्पाची प्रशंसा करण्यात आली. यावेळी मातोश्री वृध्दाश्रमातर्फे जेसीआय खामगांव सिटीचे आभार मानण्यात आले. सदर प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशाच प्रकारचे प्रकल्प भविष्यात सुध्दा राबविण्यात येणार आहे. यावेळी जेसीआयचे प्रेसीडेन्ट जेसी साकेत गोयनका, प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी स्वप्नील महर्षी, जेसी श्रेयस कलंत्री, जेसी आदित्य डिडवाणीया, जेसी कन्हैय्या अग्रवाल हे उपस्थित होते.

Post a Comment