बनावट दस्तऐवजांचे आधारे मिळवले जात प्रमाणपत्र प्रकरण

न्यायालयाने दिले गुन्हा  दाखल करण्याचे आदेश

जनोपचार न्यूज नेटवर्क कार्यालय प्रतिनिधी :  स्वतःच पैशाच्या मोबदल्यात विकलेली शेतजमीन, परत मिळवण्यासाठी आदीवासी जमातीतील असल्याचे भासवण्यासाठी  गोपाळ नगर खामगाव व  पातुर्डा बु. तालुका संग्रामपूर येथील महिलेने बनावट दस्तऐवजांचे आधारे तहसिलदार संग्रामपुर व उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर खोटे प्रतिज्ञालेख व बनावट दस्तऐवज सादर केले. त्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केले विशेष म्हणजे या जात प्रमाणपत्राची वैधता देखील केवळ १ महिन्यात प्राप्त झाली. या जात प्रमाणपत्राचा वैधता प्रमाणपत्राचा आधार घेवून तहसिलदार कार्यालय, खामगाव यांची दिशाभूल केली. त्या आधारे शेतजमीन परत मिळण्याचा आदेश प्राप्त केला. अशी अत्यंत गंभीर घटना बुलडाणा जिल्हयात घडली आहे.

याबाबत पक्षकाराचे वकील एडवोकेट आशा भागवत यांनी दिलेल्या माहितीनुसार मुळात जात प्रमाणपत्र प्राप्त करणे हे अत्यंत किचकट व वेळखाऊ काम आहे. मात्र सदर जात प्रमाणपत्र हे केवळ ४ ते ५ दिवसात प्राप्त झाले तर त्याची वैधता प्रमाणपत्र हे १ महीन्यापेक्षाही कमी कालावधीत प्राप्त झाले. या बाबत तक्रारदार अंबादास लक्ष्मण म्हात्रे यांनी चौकशी केली असता, संबंधित महिलेने जात प्रमाणपत्र प्राप्त करण्याकरीता बनावट दाखले व खोटे प्रतिज्ञालेख सादर केले असल्याचे निष्पण्ण झाले. त्यामुळे सदर बाब त्यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव जामोद यांना व वैधता समिती अमरावती यांना देखील तक्रारीद्वारे कळवून कारवाई व चौकशीची विनंती केली. मात्र संबंधित प्रशासन ढिम्मच राहीले. तर माहितीच्या अधिकारात कागदपत्र मिळण्यातही प्रचंड अडचणी निर्माण झाल्या, शेवटी तक्रारदार अंबादास मात्रे यांनी मा. न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग, खामगाव यांचे समक्ष विनंती अर्ज सादर करून गुन्हा दाखल करण्याचे निर्देश जारी करण्याची विनंती केली.

सदर प्रकरणातील दस्तऐवज व प्रतिज्ञालेखाचे आधारे दखलपात्र गुन्हयाबाबत तक्रार असल्याचे व तसे निष्पण्ण झाल्याने न्यायालयाने खामगाव शहर पोलीस स्टेशन यांना  सदर प्रकरणात कलम 420,464,468,471,34 अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश जारी केले आहेत. सदर प्रकरणात तक्रारदाराची बाजु अॅड. आशा महेश भागवत यांनी मांडली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post