महात्मा फुले प्राथमिक शाळेत विद्यार्थी प्रवेशोत्सव उत्साहात
खामगांव: जनोपचार न्यूज नेटवर्क - महात्मा फुले प्राथमिक शाळा वाडी येथे विद्यार्थी प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शाळेचे अध्यक्ष संजय बगाडे यांनी राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्या अर्पण केले.तसेच सर्व विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प व चॉकलेट देऊन स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना संस्थाध्यक्ष संजयजी बगाडे यांनी"विद्यार्थी हा देशाचा खरा आधारस्तंभ असून सर्वच विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून गावाचे आणि देशाचे नाव उज्वल करावे" असे प्रतिपादन केले. याप्रसंगी प्रमुख अतिथी दीपक महाकाळे यांनी आपल्या मनोगतातून "विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाला प्राधान्य द्यावे"असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया पाटील मॅडम यांनी तर आभार बबीता हेलोडे मॅडम यांनी व्यक्त केले.यावेळी शिक्षिका माधुरी पारस्कर,कु.शिवानी बेलोकार, सौ कल्पना महाले,तसेच बहुसंख्य विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.


إرسال تعليق